विधानसभेत ९० टक्के मुुंडे समर्थकांना उमेदवारी
By Admin | Updated: July 18, 2014 01:55 IST2014-07-18T01:37:00+5:302014-07-18T01:55:28+5:30
विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत खा.गोपीनाथ मुंडे यांच्या ९० टक्के समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.

विधानसभेत ९० टक्के मुुंडे समर्थकांना उमेदवारी
विकास राऊत, औरंगाबाद
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत खा.गोपीनाथ मुंडे यांच्या ९० टक्के समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असून, प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनीही तसा शब्द दिल्याचा दावा आ.पंकजा पालवे-मुंडे यांनी आज येथे केला. खा. मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांनी काही पत्रकारांशी चर्चा केली. मराठवाडा विभागीय बैठकीच्या निमित्ताने त्या औरंगाबादेत आल्या होत्या.
त्या म्हणाल्या, ११ जुलैनंतर राजकीय व्यासपीठावर आले आहे. नाशिक, पुणे येथील भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावली. यापूर्वी मुंडे राजकीय संघर्ष करीत होते. अता त्यांच्या समर्थकांच्या आणि माझ्यासाठी संघर्ष करावा लागेल. जे मिळविणार ते संघर्ष करूनच. खा.मुंडे यांच्या जाण्यामुळे समाज अनेक वर्षे मागे गेला आहे.
खा.मुंडे यांच्यासमोरही अनेक संघर्ष, आव्हाने होती. त्यांनी ज्यांना-ज्यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी शब्द दिला होता, त्यातील ९० टक्के लोकांना
सामील करून घेण्याचा प्रयत्न
असेल. त्यांनी ज्यांना शब्द दिला होता, त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे.
आता रडण्याऐवजी संघर्ष
३ जुलै रोजी शेवटचे रडले. यापुढे आता रडणार नाही. माझ्याकडे कुणीही दया म्हणून पाहू नये. मी संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. स्वत:वर नियंत्रण मिळवून हा निर्णय घेतला आहे.
दु:ख झटकून खा. मुंडे यांचा वारसा पुढे चालवावा लागणार
आहे. बीडमध्ये भाजपाचे ६ आमदार निवडून आणण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही हे त्यांनी जाहीर केले असले तरी त्यांचा फोकस विधानसभेवर असणार आहे. त्यामुळे नव्या दमाने काम करावे लागेल असे पंकजा यांनी स्पष्ट केले.
यशश्री राजकारणात येणार?
धाकटी बहीण यशश्री राजकारणात येणार काय, यावर आ.पालवे म्हणाल्या, कुटुंब दु:खात होते. त्यामुळे कुठे काय चर्चा झाल्या हे माहिती नाही. कुटुंबातून राजकारणात कोण येणार हे निश्चित नाही. मात्र, माझे काम सांभाळायला कुणातरी मदतीसाठी हवेच आहे. यशश्रीचे नाव न घेता त्यांनी ती राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले.
राज्यात की केंद्रात, ंिद्वधा स्थिती
राज्यात काम करावे, की केंद्रात, या द्विधा मन:स्थितीत मी आहे. पंतप्रधानांसह वरिष्ठांचे मार्गदर्शन घेईल. मी कुठे प्लॅन होते, याचा निर्णय पक्षच घेईल, अशी प्रतिक्रिया पंकजा पालवे यांनी दिली.