नऊ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
By Admin | Updated: December 28, 2016 00:06 IST2016-12-28T00:06:06+5:302016-12-28T00:06:41+5:30
जालना : मंगळवारी केलेल्या कारवाईत ९ धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली.

नऊ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
जालना : शहरात असलेली १७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने मंगळवारी पोलिस बंदोबस्तात ही धार्मिकस्थळे विधीवत पूजा करून हटविली. मंगळवारी केलेल्या कारवाईत ९ धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे वाद वगळता सर्व मोहीम शांततेत झाली. दरम्यान, ४ ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून मूर्ती तसेच बांधकाम काढून घेतले.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता या मोहिमेला सुरूवात झाली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह दीडशे कर्मचारी तसेच तेवढ्याच संख्येने पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आली. अंबड चौफुली परिसरातील म्हाडा कॉलनी, गांधी चमन, दर्गा रोड भाग, मुरारी नगर, मोदीखाना, गायत्रीनगर, जिजामाता कॉलनी आदी भागांतील धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. एकूणच नगर पालिकेने केलेल्या कारवाईला कोठारी नगरातील रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. (प्रतिनिधी)