पैनगंगा नदीपात्रातून नऊ ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: June 16, 2014 00:25 IST2014-06-16T00:17:01+5:302014-06-16T00:25:40+5:30
श्रीक्षेत्र माहूर: पैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक करणारी ९ वाहने तहसीलदारांनी कारवाई करुन ताब्यात घेतली़
पैनगंगा नदीपात्रातून नऊ ट्रॅक्टर पकडले
श्रीक्षेत्र माहूर: पैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक करणारी ९ वाहने तहसीलदारांनी कारवाई करुन ताब्यात घेतली़
तालुक्यात पैनगंगा नदीपात्रात अधिकृत सात वाळू घाट आहेत़ त्यापैकी दोन सायफळ व दिगडी कुलेमार यांचा लिलाव झाला असून नेर, टाकळी, लांजी, हिंगणी, शिवूर, पडसा, चोलेपेंड या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अनधिकृत रस्ते तयार करुन येथून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळू चोरी केली जाते़ याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले़ याची दखल घेत तहसीलदारांनी १२ व १३ रोजी मोहीम राबवून ९ ट्रॅक्टर्स वाळू व मुरुम अवैधरित्या वाहतूक करताना पकडले. या नऊ ट्रॅक्टर्समध्ये दोन ट्रॅक्टर्स विना नंबर ही चोरटी वाहतूक करीत होते़ यापैकी तीन ट्रॅक्टर्स मालकांनी त्यांचेकडे वाळू वाहतूक करण्याच्या सायफळ घाटाच्या पावत्या सादर करुन आम्ही निर्दोष आहोत असा खुलासाही दिला़ अन्य वाहनधारकांकडे मात्र वाळू उपसा अथवा वाहतुकीची कुठलीच परवानगी नाही.
पावसाळा सुरू झाल्याने या वाळू घाटातून तस्करांकडून जोरदार चोरी सुरू आहे़ यावर्षी वाळूघाट हर्रासी न झाल्याने शासनास आधीच ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले़ शिवाय ग्रामपंचायतींना गौण खनिज अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
पावसाळ्यात वाळू उपसा बंद असतो़ या कालावधीत वाळूचे दर वधारतात़ याचा फायदा उठविण्यासाठी वाळू तस्कर पैनगंगा नदीपात्रात सक्रिय झाले आहेत़
यावर आळा घालण्यासाठी मोहीम सातत्याने सुरु ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे़ (वार्ताहर)