नऊ रोडरोमिओंना दिला चोप
By Admin | Updated: May 21, 2016 23:56 IST2016-05-21T23:39:39+5:302016-05-21T23:56:50+5:30
भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़

नऊ रोडरोमिओंना दिला चोप
भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़
भोकरदन शहरातील शिकवणी वर्गच्या ठिकाणी, तसेच बसस्टँड परिसरामध्ये रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला असल्याने महिला व मुलीना त्याचा मोठा त्रास होत आहे़ २१ मे रोजी जालना येथील दामिनी पथकाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी साध्या गणवेशामध्ये बसस्टॅड परिसरामध्ये काही वेळ थांबत कारवाई केली. गाफिल असलेल्या रोडरोमिओंना चांगलाच हिसका दाखविला. यातील काही रोडरोमिओ बसस्टॅड परिसरातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या पाठीमागे जाऊन भिंतीवर चढून बघण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही बसस्टॅड परिसरात हातवारे करून इशारे करताना या पथकाला आढळून आले. या रोडरोमिओंमध्ये एका वृध्दाचा सुध्दा समावेश आहे.
या सर्व रोडरोमिओंविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात ११० प्रमाणे कारवाई करून त्याना पायबंद करून सोडून देण्यात आले़
यावेळी दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक सीमा घुगे, कर्मचारी एस़एम़वाघमारे, के़एम़ काबळे, व्ही़जे़ गुडेकर, डी़सी़अंभोरे, सवडे, गणेश पायघन, यु़बी़चव्हाण या कर्मचाऱ्यानी या रोडरोमिओविरूध्द कारवाई केली आहे़ दरम्यान, शनिवारी अचानक झालेल्या कारवाईमुळे बसस्थानक व परिसरात मोठी खळबळ उडली होती. (वार्ताहर)