खड्डे चुकविताना बसचा अपघात, नऊ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST2021-09-26T04:04:56+5:302021-09-26T04:04:56+5:30
शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बस पुणे येथून जळगावकडे (एमएच १४ सीडब्ल्यू ६६६२) जात होती. अजिंठा गावालगत ...

खड्डे चुकविताना बसचा अपघात, नऊ प्रवासी जखमी
शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बस पुणे येथून जळगावकडे (एमएच १४ सीडब्ल्यू ६६६२) जात होती. अजिंठा गावालगत असलेल्या गोलटेकडी जवळचा रस्ता खोदलेला आहे. अरुंद झालेल्या चिखलमय रस्त्यावरून गाडी जात असताना समोरून आलेल्या माल ट्रकला भिडू नये म्हणून चालकाने ब्रेक दाबले. एवढ्यात खड्डे चुकविण्यासाठी गाडीचा वेग कमी केला असता बस थेट खोदलेल्या रस्त्यावर पडल्याने बस उलटली. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि अजित विसपुते, फर्दापूर ठाण्याचे सपोनि अमोल मोरे, फौजदार के. जी. पवार, फौजदार राजू राठोड घटनास्थळी दाखल झाले. जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
----
जखमी झालेल्यांची नावे
बसमध्ये असलेले ३० प्रवासी बालंबाल बचावले. दरम्यान, तीस जणांपैकी बसमधील प्रमोद पाटील (२२), निकिता औराळे (२५), सुरेश राठोड (६७), अभिषेक राजपूत (१४), सविता राजपूत (४०), बबन मरकाल (२३, रा. जळगाव), भूषण चौधरी (२३), संगीता डांगारे (२२), अजय ढाकरे (२५) हे जखमी झाले.
----
वाहतुकीचा कायमच खोळंबा
जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बाळापूरजवळ पुन्हा रहदारी विस्कळीत झाल्याने शनिवारी सकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
-------
250921\img_20210925_194811.jpg
क्याप्शन
अजिंठा गावाजवळ उलटलेली ट्रॅव्हल दिसत आहे