नऊ लाखांची बनावट दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:27 IST2017-10-07T00:27:10+5:302017-10-07T00:27:10+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे केज तालुक्यातील होळ येथे केलेल्या कारवाईत ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला.

नऊ लाखांची बनावट दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे केज तालुक्यातील होळ येथे केलेल्या कारवाईत ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर विभागाचे उपायुक्त वाय. एम. पवार, बीडचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. अंबाजोगाई येथील पथक, राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय भरारी पथक यांनी पहाटे तीन वाजता केज तालुक्यातील होळ शिवारात दक्षिण बाजूला एका शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. तेथे अवैधरित्या साठवून ठेवलेला तसेच गोवा राज्यात विक्रीकरिता असलेला भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत निरीक्षक एस. एस. बर्गे, ए. डी. कांबळे, प्रभारी निरीक्षक ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक एच. एम. पाकलवाड, तसेच जवान मोरे, लोमटे, डुकरे, मस्के, जारवाल, सय्यद, काळे, पाटील, पवार, शेख, स्वामी यांनी भाग घेतला.