नऊ अवैध वीज कनेक्शन पकडले
By Admin | Updated: June 19, 2014 00:20 IST2014-06-19T00:03:49+5:302014-06-19T00:20:00+5:30
कळमनुरी : महावितरणच्या पथकाने दहा दिवसांत नऊ अवैध वीज कनेक्शन पकडले असल्याचे कनिष्ठ अभियंता पी. पी. साखरे यांनी सांगितले.

नऊ अवैध वीज कनेक्शन पकडले
कळमनुरी : महावितरणच्या पथकाने दहा दिवसांत नऊ अवैध वीज कनेक्शन पकडले असल्याचे कनिष्ठ अभियंता पी. पी. साखरे यांनी सांगितले.
वीजचोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणने वीजचोरी पकडण्यासाठी कळमनुरी शहरासाठी पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील दहा दिवसांत शहरातील रेणुकानगर, भोईगल्ली, नाईकवाडी मोहल्ला आदी भागात विजेच्या खांबावर आकडे टाकून वीज चोरणाऱ्या ९ जणांना पकडले. विजेच्या खांबावर टाकलेले तार पथकाने जप्त केले.
वीज चोरणाऱ्यांना वीज वापरानुसार बिल देण्यात येईल. हे वीजबिल न भरल्यास पोलिस कारवाईही करण्यात येणार आहे. वीज चोरी पकडणाऱ्या पथकात ज्योत्स्ना बोरकर, एम. के. असोले, एल. एम. मांदळे, एल. एम. वाघचौडे, इमरान पिंजारी, एम. पी. लेडांगे, एन. एम. धकाने आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)