महापालिकेतील नऊ कर्मचारी कार्यमुक्त
By Admin | Updated: March 1, 2016 23:53 IST2016-03-01T23:46:42+5:302016-03-01T23:53:08+5:30
परभणी : शहर महानगरपालिकेतील बदली झालेल्या नऊ कर्मचाऱ्यांना सोमवारी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले.

महापालिकेतील नऊ कर्मचारी कार्यमुक्त
परभणी : शहर महानगरपालिकेतील बदली झालेल्या नऊ कर्मचाऱ्यांना सोमवारी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले.
येथील महानगरपालिकेतील दहा कर्मचाऱ्यांची बदली काही दिवसांपूर्वी अन्य नगरपालिकांमध्ये झाली होती. तर डिसेंबर २०१५ मध्ये दोन सहाय्यक आयुक्तांचीही बदली झाली होती. मनपा प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त केले नव्हते. सोमवारी या कर्मचाऱ्यांचे कार्यमुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात सेलू येथे बदली झालेले भास्कर काकडे, राम जाधव, पाथरी पालिकेत बदली झालेले ए. बी. मोरे, सुवर्णा दिवाण, शाहेद अली, सोनपेठ पालिकेत बदली झालेले व्ही.आर. सर्जे, पूर्णा नगरपालिकेत बदली झालेले प्रकाश कुलकर्णी, मानवत नगरपालिकेत बदली झालेले श्याम दशरथे, प्रभा झाडगावकर आणि मानवत नगरपालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त मीर शाकेर अली यांच्या कार्यमुक्तीचे आदेश निघाले आहेत. तसेच या विभागप्रमुखांच्या जागेवर अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. ज्यात भास्कर काकडे (अंतर्गत लेखा परीक्षक) यांच्या जागी रवींद्र शिंदे, आनंद मोरे (कोर्ट केस विभाग) यांच्या जागी जाकेर अली, काकडे, मीर शाकेर अली (सहाय्यक आयुक्त ब) यांच्या जागी केशव दौंडे, प्रकाश कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी) यांच्या जागी नागेश जोशी, श्याम दशरथे, झाडगावकर (ग्रंथालय विभाग) यांच्या जागी भगवान यादव, दिवाण (कर विभाग) यांच्या जागी बी.एन. तिडके, राम जाधव (कर विभाग) यांच्या जागी पंडित अडकिणे व व्ही. ार. सर्जे यांना कार्यमुक्त केले मात्र त्यांच्या जागी कोणाचीही नेमणूक करण्यात आली नाही. सय्यद इम्रान, साहेबराव पवार यांना सोमवारी कार्यमुक्त केले नाही.