निलंगा आगारास ४ कोटींचा नफा

By Admin | Updated: May 22, 2016 00:03 IST2016-05-21T23:53:39+5:302016-05-22T00:03:42+5:30

निलंगा : आगारातील बहुतांश बसेसची अवस्था खिळखिळी झालेली असतानाही निलंगा आगाराने सन २०१५-१६ या वर्षात ४ कोटी १७ लाखांचा नफा मिळविला आहे़

Nilanga Jodhara profit of 4 crores | निलंगा आगारास ४ कोटींचा नफा

निलंगा आगारास ४ कोटींचा नफा


निलंगा : आगारातील बहुतांश बसेसची अवस्था खिळखिळी झालेली असतानाही निलंगा आगाराने सन २०१५-१६ या वर्षात ४ कोटी १७ लाखांचा नफा मिळविला आहे़
कर्नाटक सिमेवर असलेल्या निलंगा आगारात ८५ बसेस आहेत़ आगारात एकूण ४२५ कर्मचारी आहेत़ वाहक व चालकाच्या प्रत्येकी २५ जागा रिक्त आहेत़ वर्षभरात आगारातील बसेसनी १ कोटी ३० हजार किलोमीटरचे अंतर कापून ४ कोटी १७ लाखांचा नफा मिळविला आहे़ तसेच डिझेलचीही काटकसर करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रति किमीस ३४़१० पैसे होणारा खर्च आता ३२़२७ पैशांवर आला आहे़ त्यामुळे १़८३ पैशाची बचत झाली आहे़

Web Title: Nilanga Jodhara profit of 4 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.