निकिता, गायत्री, करण प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:14 AM2017-12-23T01:14:15+5:302017-12-23T01:17:08+5:30

स.भु. संस्थेतर्फे आजपासून सुरू झालेल्या क्रीडा महोत्सवात अ‍ॅथलेटिक्समध्ये निकिता शेळके, गायत्री चौधरी, करण आडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Nikita, Gayatri, Karan first | निकिता, गायत्री, करण प्रथम

निकिता, गायत्री, करण प्रथम

googlenewsNext

औरंगाबाद : स.भु. संस्थेतर्फे आजपासून सुरू झालेल्या क्रीडा महोत्सवात अ‍ॅथलेटिक्समध्ये निकिता शेळके, गायत्री चौधरी, करण आडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
अ‍ॅथलेटिक्स (निकाल- १७ वर्षांखालील मुली)- २०० मी. धावणे : १. निकिता शेळके (भराडी), २. धनश्री रोंघे (शारदा मंदिर), ३. शालिनी भालेकर (बालानगर). ४०० मी. धावणे : अश्विनी कोलते (वडोदबाजार), २. हर्षदा बनसोडे (बिडकीन), ३. वैष्णवी निकम.
गोळाफेक - १. गायत्री चौधरी (गोंदेगाव), २. निकिता शेळके (भराडी), ३. प्रांजल कुलकर्णी (औरंगाबाद).
१७ वर्षांखालील मुले (२०० मी. धावणे)- १. करण आडे (बिडकीन), २. सागर वाघ (भराडी), ३. विष्णू गवारे (भराडी).
४०० मी. धावणे- १. आजीनाथ चाटे (भराडी), २. सतीश पवार (गोंदेगाव), ३. नितीन पाटील (गोंदेगाव). गोळाफेक- १. अशोक राठोड (बिडकीन), २. कौस्तुभ कुलकर्णी (बिडकीन), ३. राहुल गाडे (भराडी).
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन औरंगाबादची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू श्वेता जाधव हिच्या हस्ते झाले. या वेळी स.भु. संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. दिनेश वकील, कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, ज्ञानप्रकाश मोदाणी, जुगलकिशोर धूत, ब.गो. फडणीस, संपतकाका गोर्डे, अरुण मेढेकर, किसनलाल तोतला, मोहिनी रसाळ, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, डॉ. विशाल देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Nikita, Gayatri, Karan first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.