शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

रात्र धावपळ, अफवा, हुरहुर अन् जागरणाची...!

By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST

औरंगाबाद : प्रचाराच्या तोफा १३ आॅक्टोबर रोजी थंडावल्यानंतर १४ आॅक्टोबर रोजी रात्रभर सर्वच उमेदवारांची रात्र जागरणातच गेली.

औरंगाबाद : प्रचाराच्या तोफा १३ आॅक्टोबर रोजी थंडावल्यानंतर १४ आॅक्टोबर रोजी रात्रभर सर्वच उमेदवारांची रात्र जागरणातच गेली. पोलिसांच्या गस्त, कार्यकर्त्यांच्या विरोधकांच्या हालचालींवर असलेला कटाक्ष आणि उमेदवारांची वेगवेगळ्या अफवांमुळे पूर्ती गाळण उडाली होती. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानेदेखील उमेदवारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. असे असतानाही रात्रीतून झालेल्या उलथा- पालथी काही थांबल्या नाहीत. प्रचाराचा गोंगाट थांबल्यानंतर उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. काही उमेदवारांना महाराजांचे आशीर्वाद, धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. अनेक समाजांनी पाठिंब्याचे पत्रही उमेदवारांना दिले. सर्व उमेदवारांची कार्यालये गर्दीने भरगच्च झालेली होती. यंत्रणेसाठी गर्दीच गर्दी पोलचिट, बुथ एजंट, मतदार ने-आण करण्यासाठी लागणारी वाहन यंत्रणा, मतदान करून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी दुपार व रात्रीची व्यवस्था यावर गटागटाने आखणी सुरू होती. फोडाफोडी, बैठका आणि धावपळीच्या वातावरणात आजचा दिवस संपला, तर रात्रदेखील याच धामधुमीत गेली. उद्या १५ रोजी सकाळीच मतदानाला सुरुवात होणार आहे. पोलचिट (मतदान पावती) मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेसह उमेदवारांची यंत्रणाही राबली. पोलचिटचे गठ्ठे, मतदार याद्या, सॉफ्टवेअर डाऊनलोडिंगसाठी उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांत गर्दी होती. तोफा थंडावल्या; पाठिंब्याची रीघप्रचाराच्या तोफा थंडावल्या, तरी पाठिंबा देण्यासाठी अनेकांची रीघ पक्ष कार्यालयांमध्ये होती. प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी मागणी पूर्ण करण्याच्या आश्वासनावर पाठिंबा देत होते. पाठिंब्याची ही खैरात धोरणांमुळे सुरू होती की, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा घसा ओला केल्यामुळे सुरू होती. यावरून उमेदवारांच्या कार्यालयात खुमासदार चर्चा सुरू होती. काही उमेदवारांचे कार्यकर्ते स्पर्धक उमेदवाराच्या प्रचार कार्यालयामधून मोबाईलवरून एसएमएस पाठवून मतदान यंत्रणेची माहिती देत होते.