दुसऱ्या दिवशी उचलला १६५ टन कचरा
By Admin | Updated: January 20, 2017 00:22 IST2017-01-20T00:20:19+5:302017-01-20T00:22:09+5:30
जालना : नगर पालिकेच्या वतीने आठवडाभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

दुसऱ्या दिवशी उचलला १६५ टन कचरा
जालना : नगर पालिकेच्या वतीने आठवडाभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गुरूवारी जुना तसेच नवीन जालना मिळून १६५ टन कचरा उचण्यात आला.
शहर परिसरात काही ठिकाणी अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढतच होते. शहरातील कचरा अड्ड्यांचे निर्मूलन करण्यासाठी नगर पालिकेने बुधवारपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी सुमारे २१० टन कचरा उचलण्यात आल्यानंतर गुरूवारी १६५ टन कचरा उचण्यात आला. सदर बाजार झोन तीन मधील भीमनगर, पोदार शाळा आदी भागातील ३३ ट्रॅक्टर फेऱ्यांद्वारे कचरा उचलण्यात आला. जुना जालना विभाग दोनमधील मोरंडी मोहल्ला, टाऊन हॉल परिसर, भवानी नगर आदी भागात ३९ ट्रॅक्टर फेऱ्यांतून कचरा उचलण्यात आला. जुना जालना एक मधील रेल्वेस्टेशन परिसर, मंमादेवी परिसर, नगर परिषद शाळा सिंगल जीन व डबल जीन मध्ये १२ ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलण्यात आला. यासाठी १५ ट्रॅक्टर, तीन टिप्पर, दोन जेसीबी तसेच दोन डम्पर प्लेसरचा वापर करण्यात आला. एकूण ८४ ट्रॅक्टर फेऱ्यांद्वारे सुमारे १६५ टन कचरा उचलण्यात आला.