शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 18:05 IST

सोलापुर-धुळे महामार्गावर अंधानेर बायपासजवळ हा अपघात झाला.

कन्नड  : दुचाकीच्या समोरासमोर धडक झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. सोलापुर-धुळे महामार्गावर अंधानेर बायपासजवळ हा अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडला. संजय सखाराम माळवे (२५ रा.सातकुंड ) व सागर पांडूरंग काळे ( ३०,रा. औरंगाबाद ) अशी मृतांची नावे आहेत. 

खाजगी बांधकाम कंपनीत अभियंता असलेला सागर काळे मोटारसायकलने ( एमएच २० एफडी ७५७७) चाळीसगावकडून  औरंगाबादकडे जात होता. तर दुसरा दुचाकीस्वार संजय माळवे हा सुद्धा मोटारसायकलने ( एमएच १९  एजी ००२६) औरंगाबादकडून सातकुंड येथे चालला होता. अंधानेर बायपासवर सध्या एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरु आहे. यामुळे या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोनि राजीव तळेकर, सपोनि डी.बी.वाघमोडे, सपोनि सचिन खटके, पोना रामचंद्र बोंदरे, पोकॉ एस.जी.आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

तोरण बांधायला जात होता सागरगणेश चतुर्थी असल्याने श्रीगणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी सागर आपल्या घरी जात होता. घराला बांधण्यासाठी मांगल्याचे प्रतिक समजले जाणारे आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यासाठी आंब्याच्या पानांची पिशवी घेऊन चालला होता मात्र त्याला हे ठाऊक नव्हते की त्याच्या नशिबात तोरण नव्हे तर मरण होते. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद