पाचोड गावातून नवविवाहीता बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:05 IST2020-12-26T04:05:02+5:302020-12-26T04:05:02+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील (रमेश साळी) नाव बदलले यांचे नांदर येथील सोनाली (नाव बदलले) सोबत सहा महिन्यांपूर्वी मोठ्या ...

Newlyweds go missing from Pachod village | पाचोड गावातून नवविवाहीता बेपत्ता

पाचोड गावातून नवविवाहीता बेपत्ता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील (रमेश साळी) नाव बदलले यांचे नांदर येथील सोनाली (नाव बदलले) सोबत सहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. (रमेश साळी) हे पत्नीला घेऊन आपल्या सासरी नांदरला गेले होते. मंगळवारी दुपारी दोघेही नांदरहुन पाचोड येथे आले. बुधवारी रात्री दाम्पत्याने जेवन केले आणि झोपी गेले असता मध्यरात्रीतूनच सोनाली घरातून निघून गेली. सकाळी रमेश झोपेतून जागे झाले असता त्यांची पत्नी घरात नसल्याचे दिसून आले. त्यांनी सर्वत्र चौकशी केली. नातेवाईक व माहेरी देखील विचारपूस केली परंतू कुठेच आढळून आली नाही. अखेर उमेश माळी यांनी पाचोड पोलिसमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास सपोनि अतुल येरमे व पोलिस जमादार सुधाकर मोहीते करीत आहेत.

Web Title: Newlyweds go missing from Pachod village