शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 4:21 PM

पुन्हा एकदा घाटीतील स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याच्या कामातील हलगर्जीपणा उघडा पडला आहे.

ठळक मुद्देवॉर्डाकडे पायी जाताना वाटेतच प्रसूतीअर्भक फरशीवर पडल्याने मृत्यू 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी वॉर्डाकडे पायी जाणाऱ्या महिलेची वाटेतच प्रसूती होऊन नवजात बाळ फरशीवर आदळून दगावल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेच्या वेळी संबंधित महिलेला स्ट्रेचरवरून वॉर्डात नेण्यात येत असते, तर बाळ दगावले नसते, असे घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा घाटीतील स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याच्या कामातील हलगर्जीपणा उघडा पडला आहे.

छावणी परिसरातील महिलेला सोमवारी रात्री प्रसूतिकळा सुरू झाल्या. तेव्हा कुटुंबियांनी महिलेला प्रारंभी छावणी रुग्णालयात नेले. याठिकाणी महिलेला प्रसूतिकळा नसल्याचे सांगून दोन गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबियांनी रात्री १ वाजेच्या सुमारास घाटीत आणले. वाहनातून उतरून ते अपघात विभागात पोहोचले. प्रसूतिकळांनी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत कुटुंबियांनाही काय करावे, ते सुचत नव्हते. स्ट्रेचरवरून वॉर्डात नेता येईल, हे कोणाला सुचलेही नाही. प्रसूतीसाठी महिलेला घेऊन ते पायीच निघाले. 

अपघात विभागातून काही पायऱ्या चढून समोरील व्हरांड्यातील लिफ्टपर्यंत पोहोचत नाही तोच महिलेची अचानक प्रसूती झाली आणि नवजात बाळ थेट फरशीवर पडले. या घटनेनंतर एकच धावपळ सुरू झाली. घटनेनंतर अनेकांनी मदतीसाठी धावाधाव केली. एका परिचारिकेने बाळ वेगळे करीत त्यास प्रसूती कक्षात हलवले; परंतु तोपर्यंत ते दगावले होते. 

बाळ दगावलेले होतेस्ट्रेचरवरून वॉर्डात नेताना जर प्रसूती झाली असती, तर बाळ खाली पडले नसते. त्यामुळे स्ट्रेचरचा वापर केला असता तर ते सुखरूप राहिले असते, असे घाटीतील एका डॉक्टरांनी सांगितले. बाळ खाली पडले, याची माहिती आम्हाला नाही; परंतु बाळ मृत होते, असे प्रसूतिशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.

महिलेला सांगितले बाळ काचेत ठेवले आहेया घटनेतील महिलेला बाळ दगावल्याची कल्पना कुटुंबियांनी मंगळवारी दुपारपर्यंतही दिलेली नव्हती. बाळ काचेत ठेवलेले आहे, असेच कुटुंबियांनी तिला सांगितले होते. प्रसूतीसाठी पायी जाताना बाळ खाली पडले आणि दगावले. अपघात विभागातून स्ट्रेचर घेण्याचे सुचले नाही; परंतु बाळ पडल्यानंतर सर्व जण आले, अशी वेळ कोणावरही येऊ नये, असे महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले.

चौकशी करण्यात येईल महिला प्रसूतीसाठी उशिराने येतात. या घटनेत नेमके काय सुरू आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. स्ट्रेचरसंदर्भात काय झाले, याचीही माहिती घेतली जाईल.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

नातेवाईकांची तक्रार नाहीसदर महिला प्रसूतिगृहात आली तेव्हा तिची वॉर्डाखालीच प्रसूती झालेली होती. प्रसूतीनंतर बाळ दगावलेले होते. नातेवाईकांनी काहीही तक्रार केलेली नाही.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूतिशास्त्र विभाग

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू