अल्पजीवी ठरू नयेत नववर्षाचे संकल्प; जाणून घ्या पूर्णत्वास कसे न्यायचे

By संतोष हिरेमठ | Published: January 6, 2024 11:21 AM2024-01-06T11:21:14+5:302024-01-06T11:25:01+5:30

नववर्षाचे संकल्प पूर्ण कसे कराल?

New Year's resolutions should not be short-lived; Learn how to do it to perfection | अल्पजीवी ठरू नयेत नववर्षाचे संकल्प; जाणून घ्या पूर्णत्वास कसे न्यायचे

अल्पजीवी ठरू नयेत नववर्षाचे संकल्प; जाणून घ्या पूर्णत्वास कसे न्यायचे

छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षानिमित्त अनेकांनी संकल्प केला आहे. मात्र, काहीजणांचे हे संकल्प चार दिवसांचेच ठरतात. वेगवेगळ्या कारणांनी संकल्प पूर्ण केले जात नाहीत. त्यामुळे संकल्प तसेच राहतात. मात्र, थोडेसे मनावर घेतले, निश्चय केला तर प्रत्येक संकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो, असे मनोविकारतज्ज्ञांनी म्हटले.

नववर्षाचे नवीन संकल्प
नवीन वर्षानिमित्त काहींनी सकाळी लवकर उठायचे, नियमितपणे व्यायाम करायचा, रोज पुस्तक वाचायचे असे संकल्प केले आहेत. नवीन वाद्य शिकायचे, गायन शिकायचे असाही संकल्प काहींनी केला आहे. काहींनी तर नव्या वर्षात व्यसन करायचे नाही, असाही संकल्प केला आहे.

संकल्प पूर्णत्वास कसे न्यायचे?
काय कराल?

दिवसाच्या प्रारंभी पहिला विचार संकल्पाचा : दिवसाची सुरुवात होतानाच केलेल्या संकल्पाचा विचार करावा. त्यासाठी वेळ निश्चित करावा.
हळूहळू करा सुरुवात : कोणताही संकल्प एकदम पूर्ण होणार नाही. त्याची सुरुवात हळूहळू केली तरच पूर्ण होईल.
मित्र, कुटुंबीयांची साथ : एकसारखे संकल्प असलेल्या मित्रांसोबत राहावे. संकल्पाची कुटुंबीयांनाही माहिती द्यावी. त्यातून संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळते.

काय टाळाल
एक दिवसही आळस नको : नियमित व्यायामाचा संकल्प केला असेल तर त्यासाठी एकही दिवस आळस करता कामा नये.
निकालाची चिंता नको : संकल्प पूर्ण झाला तरी काही फायदा होणार नाही, अशी चिंता करता कामा नये. तो पूर्ण करण्यावरच भर द्यावा.
नकारात्मक लोकांपासून राहा दूर : संकल्पाविषयी सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींपासून दूरच राहिले पाहिजे.

प्रेरणा कायम ठेवावी
नववर्षाचे संकल्प पूर्ण होण्यासाठी प्रेरणा कायम ठेवली पाहिजे. काही ‘रिझल्ट’ नाही भेटला तरी हे करायचे आहे, हे निश्चित करावे. कोणत्याही कारणाने निराश होऊ नये. संकल्प पूर्ण करण्याची मानसिक तयारी करावी.
-डॉ. सना खिलजी, मनोविकारतज्ज्ञ

Web Title: New Year's resolutions should not be short-lived; Learn how to do it to perfection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.