शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

बिडकीन डीएमआयसीमध्ये अवनी पॉवर करणार १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:35 IST

आणखी २२ कंपन्या डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटींतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गतवर्षी टोयोटा-किर्लोस्कर मोटार्ससह जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल आणि एथर एनर्जींनी प्रकल्प उभारण्याचे जाहीर केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन २२ उद्योग येण्यास उत्सुक आहेत. जपानची त्सुशो कॉर्पोरेशन आणि ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनल कंपनी आणि जर्मनीच्या सिमेन्स कंपनीने येथे गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. यासोबतच लिथिनिअम बॅटरी सेल उत्पादन करणाऱ्या जेनसोल ग्रुपच्या अवनी पॉवर कंपनीने येथे तब्बल १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्या येथे येत असल्याने मराठवाड्यासाठी नवे वर्ष गुंतवणुकीचे असल्याचे संकेत आहेत.

ऑरिक सिटीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आता केवळ ४६९ एकर ३९ गुंठे जमीन उरली आहे. मोजकीच औद्योगिक जमीन उपलब्ध असताना जपानच्या त्सुशो कॉर्पोरेशन कंपनीने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. या कंपनीने ७५ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही कंपनी बिडकीनमध्ये ६५० लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. जपानी कंपनी ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनलने ऑरिककडे ५८ एकर जमिनीची मागणी केली. ही कंपनी येथे ४ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. सुमारे ३ हजार रोजगार उपलब्ध केल्याचे ऑरिककडून समजले. याशिवाय मॅट्रिक गॅस या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने बिडकीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी १३६ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही कंपनी येथे ९ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, ४ हजार जणांना रोजगार देणार आहे, तर जर्मनीच्या सिमेंन्स कंपनीने २५ एकर जमिनीची मागणी नोंदविली. कंपनी येथे २५०० कोटींची गुंतवणूक करणार असून, सुमारे १२०० लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. अवनी पॉवरने बिडकीनमध्ये १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणुकीची तयारी दर्शवित १५८ एकर जमिनीची मागणी केली आहे.

आणखी या कंपन्याही येण्याची शक्यता (कंसात त्यांची गुंतवणुकीची रक्कम)फिंडाबिलटी सायन्सेस प्रा.लि. - २० कोटीह्योसंग कॉर्पेारेशन प्रा.लि. - २५२० कोटीमरुबेनी-इटोची स्टील इंडिया.प्रा.लि. - २०० कोटी.एमटीसी ग्रुप- ३००० कोटीरेलिक मटेरियल प्रा.लि. - ५० कोटीनिप्पोन एक्स्प्रेस लॉजिस्टिक लि. - १०० कोटीमहिंद्रा एस्सीलो - ३०० कोटी.केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजी प्रा.लि. - १२५ कोटी.ट्रेक्स् एनर्जी प्रा.लि. - १००० कोटी.इंडो ऑटो टेक प्रा.लि. - ३०० कोटी.ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक प्रा. लि. - ३५० कोटीटोयोटा-किर्लोस्कर कंपनीला स्कील ट्रेनिंग सेंटरसाठी ५० एकर

डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टाेयोटा-किर्लोस्कर मोटार्सने ८१७ एकरवर प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला. आता स्कील ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी कंपनीने बिडकीनमध्ये ५० एकर जमिनीची मागणी केल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी