शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमटीडीसी’चे नवे व्हिजन; अजिंठ्याला थीम पार्क-मेडिटेशन सेंटर, जायकवाडीत वाॅटर स्पोर्ट

By संतोष हिरेमठ | Updated: September 25, 2024 19:31 IST

पर्यटननगरीत पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यावर भर

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आता नवीन व्हिजन समोर ठेवून पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे थीम पार्क, मेडिटेशन सेंटर, वाॅटर पार्क सुरू करण्यासाठीही चाचपणी सुरू आहे. कोयना जलाशयाप्रमाणे जायकवाडीतही वाॅटर स्पोर्ट सुरू होईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यातून पर्यटकांचा मुक्काम वाढण्यास मदत होईल, असे ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

शहरात आलेल्या सूर्यवंशी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. पर्यटन वाढीसाठी ‘एमटीडीसी’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यावर आता भर दिला जात आहे. अजिंठा लेणी येथे खूप जागा आहे. याठिकाणी नवीन काही करता येईल, यासाठी नियोजन करीत आहेत.

वेरूळला आल्यानंतर पर्यटकांनी वाॅटर स्पोर्टसाठी जायकवाडीलाही गेले पाहिजे, असा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन चाचपणी केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही काही प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल, असे सूर्यवंशी म्हणाले.

रेस्टाॅरंट, पर्यटक निवासांवरून आता पर्यटन सुविधांकडेसूर्यवंशी म्हणाले, सुरुवातीच्या काळात पर्यटक निवासांची गरज होती. ही गरज ‘एमटीडीसी’ने पूर्ण केली. गेल्या काही वर्षांत पर्यटक निवास, रेस्टाॅरंटची संख्या वाढली आहे. त्यामुळे ‘एमटीडीसी’ रेस्टाॅरंट, पर्यटक निवासांवरून आता पर्यटन सुविधा वाढीकडे लक्ष देत आहे. बोट क्लब, वाॅटर स्पोर्टसह अनेक बाबी आणत आहोत.

रेस्टाॅरंट होणार थ्री, फोर अन् फाईव्ह स्टार‘एमटीडीसी’च्या रेस्टाॅरंटचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. यातून हे रेस्टाॅरंट थ्री, फोर आणि फाईव्ह स्टारमध्ये बदलतील. त्यातून पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतील, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद