शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेस नवीन वळण; प्रकल्प सल्लागार समितीने गाशा गुंडाळला, आतापर्यंत घेतले ९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:57 IST

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पीएमसी म्हणून यश कन्सल्टंटची नेमणूक केली होती; आता होणार प्रकल्प सल्लागार समितीच्या नेमणुकीपासून चौकशी?

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत मोठी घडामोड समोर आली. योजनेवर काम करणाऱ्या यश कन्सल्टंट या प्रकल्प सल्लागार समितीने (पीएमसी) स्वत:हून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कर्मचाऱ्यांनाही पीएमसीने काढून घेतले. आतापर्यंत पीएमसीने ८ कोटींहून अधिक रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे विशेष बाब म्हणूनही १ कोटींपर्यंत रक्कम घेतली.

नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात येत आहे. न्या. रवींद्र घुगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी योजनेचा आढावा घेतला. पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयाने यापूर्वीच पीएमसीची गरज आहे का, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली होती. अधिकाऱ्यांनीही आम्ही सक्षम असल्याचे म्हटले होते.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पीएमसी म्हणून यश कन्सल्टंटची नेमणूक केली होती. १४३८ कोटी रुपयांच्या एका निविदेत ०.४७ टक्के दराने एजन्सीला काम दिले. कन्सल्टंटचे कर्मचारी मागील चार वर्षांपासून कामही करीत होते. चुकीच्या पद्धतीने बसविलेले व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीवर रस्ता या दोन मुद्यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पीएमसीवर खापर फोडले. १५ जानेवारी रोजीच पीएमसीने स्वत:हून काम सोडत असल्याचे पत्र मजीप्रा अधिकाऱ्यांना दिले. दुसऱ्या दिवशी योजनेवरील सर्व कर्मचारीही परत बोलावून घेतले. मजीप्राने तातडीने दुसऱ्या एका पीएमसीची नियुक्ती केल्याची माहिती आहे.

आठ कोटी रुपये अदामजीप्राच्या अधिकाऱ्यांनी योजनेचे जेवढे काम झाले, त्यानुसार जीव्हीपीआर कंपनीला पैसे दिले.कंपनीला आतापर्यंत १३०० कोटी रुपये दिले. त्यानुसार पीएमसीला आठ कोटी रुपये देण्यात आले.स्पेशल रिलीफ म्हणून पीएमसीला एक कोटीपर्यंत रक्कम देण्यात आल्याची चर्चाही मजीप्रा कार्यालयात आहे.

स्पेशल रिलीफ कोणाला?योजनेचे काम करणाऱ्या कंपनीला स्पेशल रिलीफ म्हणून काही रक्कम देण्याची तरतूद आहे. पीएमसीला ही रक्कम कशी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी