९ हजार मतिमंदांच्या जीवनाला नवे वळण
By Admin | Updated: April 27, 2015 01:01 IST2015-04-27T00:34:51+5:302015-04-27T01:01:15+5:30
बीड : सामान्य रूग्णांपेक्षा गतीमंद, मतिमंद रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचे कौशल्य पणाला लागते.

९ हजार मतिमंदांच्या जीवनाला नवे वळण
बीड : सामान्य रूग्णांपेक्षा गतीमंद, मतिमंद रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचे कौशल्य पणाला लागते. जन्मापासून शारिरीक व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवनात आशा पल्लवित करण्याचे काम येथे ‘एस.के.एच. महाविद्यालय आणि प्रेडीक्टिव होमिओपॅथी’ या संस्थांनी केले आहे. पाच वर्षात ९ हजार रूग्णांना याचा लाभ झाला.
प्रत्येक वर्षी चार वेळा या संस्थांमार्फत हा उपक्रम मोफत राबविला जातो. सध्या हे शिबीर एसकेएच महाविद्यालयात सुरू आहे.
राज्याबाहेरील रूग्णांची हजेरी
शिबिरात महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्रप्रदेश, तमीळनाडू, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, छत्तीसगढ आदी राज्यांतून रूग्ण येथे येतात. स्थानिक रूग्णांनाही याचा फायदा होत आहे.
प्रत्येक ३ महिन्यात शिबीर
संस्थांद्वारे आतापर्यंत १८ शिबिरे घेण्यात आली असून ९ हजार रूग्णांनी लाभ घेतला आहे. यामध्ये ३५ टक्के रूग्णांचा आजार बऱ्यापैकी दुरूस्त झाल्याचे डॉ.महेंद्र गौशाळ म्हणाले.
जागतिक तज्ज्ञांकडून उपचार
रूग्णांवर जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार केले जात आहे.
डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ. आसिफ, डॉ. पुनित शर्मा, डॉ.मलिक, डॉ.अरूण भस्मे हे तज्ज्ञ डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत आहेत. (प्रतिनिधी)