मुंबईसाठी नवीन रेल्वेगाडी
By Admin | Updated: June 16, 2017 23:23 IST2017-06-16T23:18:46+5:302017-06-16T23:23:10+5:30
हिंगोली : नांदेड - मुंबई अशी नवीन नियमित रेल्वे लवकरच धावणार असून तिला अकोला-हिंगोली-पूर्णा अशी लिंक एक्सप्रेस जोडण्यात येणार असल्याची माहिती खा. राजीव सातव यांनी दिली.

मुंबईसाठी नवीन रेल्वेगाडी
हिंगोली : नांदेड - मुंबई अशी नवीन नियमित रेल्वे लवकरच धावणार असून तिला अकोला-हिंगोली-पूर्णा अशी लिंक एक्सप्रेस जोडण्यात येणार असल्याची माहिती खा. राजीव सातव यांनी दिली.
खा. सातव म्हणाले, हिंगोली लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी रेल्वेमंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यात नांदेडहून मुंबईसाठी नवीन रेल्वे येत्या दोन महिन्यांत धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून देवगिरीनंतर निघेल. तिलाच अकोला-हिंगोली-पूर्णा रेल्वेचे काही डब्बे लिंक एक्सप्रेस म्हणून जोडण्यात येणार आहेत. हिंगोली येथून सायंकाळी सातच्या सुमारास पूर्णाकडे जाणारी रेल्वे येईल. तर तेथे नांदेड-मुंबईला लिंक झाल्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंस मुंबईला पोहोचणार आहे. ही मागणी केल्यानंतर मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी त्याला हिरवी झेंडी दाखविली आहे, असेही खआ. सातव यांनी सांगितले.