‘एसटी’ला मिळाले नवीन अधिकारी
By Admin | Updated: March 31, 2015 00:39 IST2015-03-30T23:55:48+5:302015-03-31T00:39:50+5:30
बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी (डीटीओ) म्हणून उद्धव वावरे रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पैठण आगारात आगारप्रमुख म्हणून कार्यरत होते.

‘एसटी’ला मिळाले नवीन अधिकारी
बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी (डीटीओ) म्हणून उद्धव वावरे रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पैठण आगारात आगारप्रमुख म्हणून कार्यरत होते. तर विभागीय वाहतूक अधीक्षक (डीटीएस) म्हणून पाटोद्याचे आगारप्रमुख अमोल गोंजारी हे रूजू झाले आहेत.
येथील रापम च्या विभागीय कार्यालयात मागील अनेक दिवसांपासून विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्या जागा रिक्त होत्या. या रिक्त जागांमुळे अनेक कामे धिम्या गतीने होत होती, कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकर मार्गी लागत नव्हत्या. केवळ जी.एम.जगतकर यांच्याकडे या दोन्ही पदाचा अतिरिक्त पदभार होता. मात्र आता या दोन्ही जागा भरण्यात आल्या आहेत.
या दोन्ही जागेवर दोन कर्तव्यदक्ष अधिकारी रूजू झाले आहेत. २८ वर्षाचा अनुभव असलेल्या वावरे यांनी तीन वर्ष आष्टी आगारात आगारप्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे, तर गोंजारी हे पाटोद्यात आगारप्रमुख म्हणून होते. (प्रतिनिधी)
सुविधा देण्याचे आव्हान
४आजही जिल्ह्यातील अनेक बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. यापूर्वी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत होते, मात्र आता हे दोन अधिकारी प्रवाशांना सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरतील का, हे आता वेळच ठरवणार आहे.