छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेकडून १ जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू करण्यात येत आहे. यानुसार काही रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस, हिंगोली - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस यासह अनेक रेल्वेंच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळांत बदल झाला आहे.
प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वे चौकशी प्रणाली, रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, स्टेशन चौकशी कार्यालय किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून नवीन वेळापत्रकाची माहिती घ्यावी. ज्या प्रवाशांनी १ जानेवारी किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले आहे, त्यांनी संबंधित रेल्वेगाड्यांची अद्ययावत वेळेची तपासणी करण्याचे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेने केले आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील वेळ
रेल्वे- सध्याची वेळ - नवीन वेळ (येण्याची / जाण्याची)- हिंगोली - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस - स. ९:३०/९:३५-९:३५/९:४० वा.
- मुंबई - नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस- सायं. ६:४८/६:५०- सायं. ६:५३/६:५५ वा.- दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस- रात्री १२:४५/१२:५०- रात्री १:०५/१:१० वा.
- निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस - स. ८:२०/८:२५-८:२५/८:३० वा.- अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस - स. ९:४०/९:४५ - स. १०:००/१०:०५ वा.
- मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस - सायं. ६:५५/७:००- सायं. ७:१५/७:२० वा.- नरसापूर-नगरसोल सुपरफास्ट एक्स्प्रेस- पहाटे ४:३०/४:३५- पहाटे ४:५०/४:५५ वा.
- चेन्नई - नगरसोल साप्ताहिक एक्स्प्रेस - स. ९:५५/१०:००- स. १०:०५/१०:१० वा.- रामेश्वर- ओखा एक्स्प्रेस - स.९:५५/१०:००- स. १०:०५/१०:१० वा.
- हिसार- हैदराबाद एक्स्प्रेस- सायं. ६:५५ /७:००- सायं. ७:१५/७:२० वा.- काचिगुडा - मनमाड अजिंठा एक्स्प्रेस - पहाटे ४:४०/४:४५ - पहाटे ५:२५/५:३० वा.
- धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस- स. ९:४५/९:५०- स. ९:५०/९:५५ वा.- नगरसोल - जालना डेम्यू - सायं. ७:४३/७:४५- सायं. ७:५३/७:५५ वा.
Web Summary : From January 1st, several train schedules via Chhatrapati Sambhajinagar Station change. Vande Bharat, Sachkhand, Janshatabdi, and other express arrival/departure times are revised. Passengers are advised to check the updated timetable before traveling.
Web Summary : 1 जनवरी से छत्रपति संभाजीनगर स्टेशन से गुजरने वाली कई ट्रेनों का समय बदला। वंदे भारत, सचखंड, जनशताब्दी और अन्य एक्सप्रेस के आगमन/प्रस्थान समय संशोधित। यात्रियों को यात्रा से पहले अपडेटेड समय-सारणी जांचने की सलाह दी जाती है।