शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

वसूली गँगचे कर्जदारांच्या संपर्कातील महिलांना धमकीचे कॉल, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:15 IST

इगतपुरीमध्ये सुरू होता बोगस कॉल सेंटरचा गोरखधंदा, एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांंचा छापा, दोघांना अटक

इगतपुरी/नाशिक : कर्जवसुलीच्या नावाखाली राज्यभरातील कर्जदारांच्या आसपासच्या, संपर्कातील महिलांची इत्थंभूत माहिती गोळा करून अश्लील कॉल करून पैसे वसुलीसाठी धमकावले जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा गोरखधंदा उघडकीस आणला. यात कॉल सेंटर चालवणारा नरेंद्र शशिकांत भोंडवे (३२, रा. इगतपुरी) व पारस संजय भिसे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमधील एका ३१ वर्षीय वकील महिलेला १५ सप्टेंबर रोजी कॉल प्राप्त झाला. एका महिलेच्या कर्जाचा संदर्भ देत त्यांनी थेट धमकावणे, अरेरावी सुरू केली. महिला वकिलाने त्यांचा त्या महिलेशी व कर्जासोबत काहीच संबंध नसल्याचे सांगितले. तरीही कर्जदार महिलेला कॉल कॉन्फरन्सवर घेऊन कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी अश्लील शिवीगाळ सुरू केली. अत्यंत खालच्या स्तरावर बाेलत त्याने महिला वकिलाला धमकावणे सुरू केले. विशेष म्हणजे, वकिलांच्या घरपरिसरातील अनेक महिलांना असे कॉल आले. या प्रकारामुळे संतप्त महिलेने थेट सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याकडे तक्रार केली. पांढरे यांनी कॉलच्या क्रमांकाची माहिती घेतली असता सर्व क्रमांक इगतपुरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पांढरे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना संपर्क करून सर्व माहिती पुरवली.

नाशिक ग्रामीण पोलिसांची तत्परता, तत्काळ खातरजमा करीत कारवाईप्राप्त माहितीची खातरजमा करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सदर ठिकाणावर जात खातरजमा केली. त्यात इगतपुरीच्या मीनाताई ठाकरे संकुलात क्रेडिट कार्डच्या कर्जवसुलीसाठी अवैधरीत्या कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तेथून नरेंद्र व पारसला ताब्यात घेत मोबाइल व सीमकार्ड, असा २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इगतपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

...असे चालते रॅकेट-राज्यातील अनेक नामांकित बँका, पतसंस्थांद्वारे अशा बोगस कॉल सेंटरला कर्जदारांचा छळ करून कर्जवसुलीसाठी कंत्राट दिले जाते. क्रेडिट कार्डद्वारे दिले जाणारे गृह व अन्य कर्जाची वसुली करण्याकरिता कर्जदार व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सोशल मीडियावरील फ्रेंड्स यादीतील लोकांना संपर्क करतात.-बँकेकडील बनावट ओळख दाखवत बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करीत कर्जवसुलीचे प्रयत्न केले जातात.-कारवाई झालेल्या कॉल सेंटरमध्ये ४० ते ५० कर्मचारी काम करतात. कॉल सेंटर चालक अवैधरीत्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डेटा संकलित करून संपर्क करतात. या काॅल सेंटरला स्थानिक नगर परिषदेचा कुठलाच परवाना नसल्याचेही निदर्शनास आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर