शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नवी औषधी ‘क्वारंटाइन’ करून तपासणी, पण मराठवाड्यात ‘एनएबीएल’ लॅबच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:17 IST

आरोग्य विभागाकडून औषधीवर खर्च, तपासणी दुसऱ्यांकडून : करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

छत्रपती संभाजीनगर : राज्य पातळीवरून आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या प्रयोगशाळेत पाठविली जातात. तोपर्यंत औषधी ‘क्वारंटाइन’ केली जातात. हा आतापर्यंत स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधींसाठी नव्हता. मात्र, बनावट औषधींच्या प्रकारानंतर ऑगस्टपासून हा नियम स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधींसाठीही लागू झाला आहे. मात्र, मराठवाड्यात ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या लॅबच नसल्याने मुंबईसह अन्य राज्यांतील लॅबवर आरोग्य विभागाला विसंबून राहावे लागत आहे.

आरोग्य विभागाकडून औषधी खरेदी करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, या औषधींची तपासणी स्वत: करण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आरोग्य विभागाकडून करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. याठिकाणी औषधींची तपासणी करण्याची यंत्रणा उभी करण्याच्या हालचाली मध्यंतरी झाल्या. परंतु यावर कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सहा वर्षांपासून ‘विशाल’कडून पुरवठाजिल्हा सामान्य रुग्णालयाला गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसकडून औषधी पुरवठा होतो. तसेच त्यापूर्वीही या एजन्सीकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवठा झाल्याचे समजते.

सात प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या राज्यपातळीवरून पुरवठा झालेल्या ७ प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’ करण्यात आलेली आहे. या औषधींची नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेली आहेत.

२५७ प्रकारची औषधी खरेेदी प्रक्रियाजिल्हा रुग्णालयात २५७ प्रकारची औषधी खरेदी प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व औषधी प्राप्त झाल्यानंतर ती क्वारंटाइन केली जातील. अहवाल आल्यानंतरच रुग्णांना दिली जातील. यास २० ते २२ दिवस लागतील.

औषधी खरेदी करताना यावर आता करडी नजर- पॅकेजिंग.- ‘डब्ल्यूएचओ- गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ मानांकन.- ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ मानांकन.- किमान दीड वर्षांची एक्स्पायरी डेट

चारही जिल्ह्यांचा आढावाआरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत आहे. मे. विशाल एंटरप्रायजेसने कुठे कुठे औषधी पुरवठा केला आहे, याची माहिती घेतली जात आहे.- डाॅ. कांचन वानेरे, उपसंचालक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यmedicineऔषधं