आठवले बीडचे नवे शिक्षणाधिकारी
By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:44:42+5:302014-05-31T00:56:03+5:30
बीड : बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून एल़ एल़ आठवले यांची शुक्रवारी नियुक्ती झाली आहे़

आठवले बीडचे नवे शिक्षणाधिकारी
बीड : बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून एल़ एल़ आठवले यांची शुक्रवारी नियुक्ती झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्याला चार महिन्यानंतर कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी मिळाले आहेत़ शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी ‘चार्ज’ सर्व शिक्षा अभियानचे शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांच्याकडे होता़ एल़ एल़ आठवले हे यापूर्वी परभणी येथे कार्यरत होते़ ते जून महिन्यात शिक्षणाधिकारी (प्रा़) या पदाचा पदभार स्वीकारतील़ शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत़ तब्बल चार महिन्यांनंतर बीडच्या प्राथमिक विभागाला शिक्षणाधिकारी मिळणार आहेत़ ते आल्यावर देवगुडे हे सर्व शिक्षा अभियानच्या शिक्षणाधिकारीपदी पूर्णवेळ काम पाहतील़ शिक्षण विभागातील बेकायदेशीर कामांना चाप लावण्याचे आव्हान आठवलेंपुढे राहील़(प्रतिनिधी) तृप्ती अंधारेंची भूमला बदली माजलगाव येथील गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे विनंती बदली करण्यात आली आहे़ त्या शुक्रवारी कार्यमुक्त झाल्या़ इ- गर्व्हनर्स, दफ्तरातल्या कविता, दफ्तराविना शाळा असे नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी राबविले़ बीडच्या उपशिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त पदभारही त्यांनी सांभाळला़ विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाला पाठीशी घातल्याच्या कारणावरुन त्या गोत्यात आल्या़ शिवाय भारिप कार्यकर्ते व त्यांच्यातील वादही चांगलाच गाजला़