शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

पशुखाद्य महागल्याने औरंगाबादमधील पशुपालकांसमोर नवे संकट; बोंडअळीचा असाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:44 IST

एकीकडे दुधाच्या किमतीवरून ‘राजकारण’ ऊतू चालले असताना. दुसरीकडे  पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. 

ठळक मुद्देबोंडअळीमुळे सरकीच्या ढेप उत्पादनात घटसरकी ढेपची साठेबाजी होत असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी फेटाळला

औरंगाबाद : एकीकडे दुधाच्या किमतीवरून ‘राजकारण’ ऊतू चालले असताना. दुसरीकडे  पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. यंदा कपाशीवर बोंडअळीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे राज्यातील कपाशीचे उत्पादन घटले आहे. मागणीच्या तुलनेत सरकीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी, सरकी ढेपचे भाव वधारले आहे. यामुळे शाळू ज्वारीचा चारा (कडबा), उसाची कुट्टीही महागली आहे. यामुळे पशुपालकांना जनावरांच्या खाद्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. व्यापार्‍यांच्या मते औरंगाबादेत दररोज ४० ते ५० टन ढेप विकल्या जाते. 

औरंगाबादच नव्हे तर जालना, नांदेड, परभणी आदी ठिकाणच्या आॅईल मिलमधून सरकी ढेपची शहरात आवक होते. राज्यात यंदा ४२ लाख हेक्टरवर बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. सरकारच्या आकडेवारीनुसार २० जिल्ह्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे ५ लाख शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईसाठी सरकारकडे अर्ज केले आहे. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले तसेच सरकीचेही उत्पादन घटले आहे. परिणामी, क्विंटलमागे २५० रुपयांनी सरकी ढेपचे भाव वधारले.

यासंदर्भात व्यापारी भरत कसबेकर यांंनी सांगितले की, १५ ते २० दिवसांपूर्वी सरकी ढेप १७०० ते १८०० रुपये क्विंटल विकली जात असे, आज १९५० ते २०५० रुपये क्विंटल विकली जात आहे. सरकी ढेप महागल्याने त्याचा परिणाम शाळू ज्वारीच्या चार्‍यावर (कडबा)वर झाला आहे. आता ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आल्याने चाराही कमी झाला आहे. यासंदर्भात कडबा विक्रेता शेख युनूस यांनी सांगितले की, १८०० ते २००० रुपये शेकडा विक्री होणारा कडबा आता २२०० ते २३०० रुपये विकत आहे. तसेच २००० रुपये टन विकली जाणारी उसाची कुट्टी आता २५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.  

सरकी ढेपच्या साठेबाजीने भाववाढ झाल्याचा आरोप आवक घटल्याने साठेबाजांनी सरकी ढेपचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केल्याने भाववाढ झाल्याचे पशुपालक  हरीश पवार यांनी आरोप केला आहे; पण सरकी ढेपच्या व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, मागील वर्षी २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव असताना काही व्यापार्‍यांनी सरकी ढेपचा साठा केला होता. नंतर मात्र, त्यांना १६०० ते १७०० रुपयांनी सरकी ढेप विकावी लागली. यामुळे साठा करणारे यंदा सावधतेने पाऊल उचलत आहेत. 

दररोज ६२० रुपयांचा खर्च वाढलाएका म्हशीला दररोज ६ कडब्याच्या पेंड्या व ७ किलो सरकी ढेप खाण्यास लागते. १५ दिवसांपूर्वी २०० रुपये खर्च येत आता २६२ रुपये खर्च येत आहे. माझ्याकडे १० म्हशी आहे. दररोज जास्तीचे ६२० रुपये खर्च करावे लागत आहे. सरकारने सरकी ढेपच्या साठेबाजीवर बंदी आणावी तरच सरकी ढेपचे भाव कमी होतील. - अर्जुन पवार, पशुपालक, सिडको साईनगर