छत्रपती संभाजीनगर : कचऱ्याचे संकलन करण्यासाठी अहमदाबाद येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीची मनपाने निवड केली असून, कंपनीला कामाची वर्कऑर्डर सुद्धा देण्यात आली. कंपनीचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, त्यापूर्वी सर्वेक्षणासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. घंटागाडीचे मार्ग, नागरी वसाहती, व्यापारी परिसर, कचरा संकलन केंद्र आदी गोष्टींचा अभ्यास कंपनीने सुरू केला आहे.
पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला शहरातील कचरा संकलनात अपयश आले. दरमहा कंपनीला ३ कोटींहून अधिक रक्कम देऊनही शहर स्वच्छ होत नाही. त्यामुळे देशात सर्वाधिक स्वच्छ असलेल्या दहा शहरांमध्ये काम करणाऱ्या कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्यासाठी निविदा काढली. या प्रक्रियेत अहमदाबाद येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीची निवड केली. कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कंपनीने शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. घंटागाडी चारही बाजूंनी बंद राहील. मोठे कंटेनरही अत्याधुनिक आणि चारही बाजूंनी बंद राहतील. याची डिझाईन अद्याप निश्चित केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
३८० घंटागाड्यानवीन कंपनीला दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल. घंटागाडीच्या जेवढ्या फेऱ्या होतील, त्यावर बिल दिले जाणार आहे. कंपनीला सुरुवातीला ३८० घंटागाड्या नवीन आणाव्यात, असे सांगण्यात आले. एका घंटागाडीत १२०० किलो कचऱ्याची वाहतूक करण्यात येणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करणे हे कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. या कंपनीच्या घंटा गाडीत मिश्र कचरा आढळून आल्यास दंडाची तरतूद करारामध्ये आहे.
कंपनीकडून अभ्यास सुरूकचरा संकलन आणि वाहतुकीचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, त्याची पूर्व तयारी करण्यासाठी कंपनीने सर्वेक्षण हाती घेतले आहे. सर्वेक्षणात वसाहती, वॉर्ड, निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता, रोज निघणारा कचरा, सणासुदीच्या काळात निघणारा कचरा, कचऱ्यात भविष्यात होऊ शकणारी वाढ आदींचा अंदाज घेतला जात आहे.
Web Summary : A new company, Western Imaginary, will handle Chhatrapati Sambhajinagar's garbage collection starting February 1st. Replacing a previous contractor, the company is currently surveying the city with 100 employees, planning routes and assessing waste generation to improve cleanliness with modern equipment.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में 1 फरवरी से वेस्टर्न इमेजनरी नामक एक नई कंपनी कचरा संग्रह करेगी। पिछली ठेकेदार को बदलने वाली कंपनी, वर्तमान में 100 कर्मचारियों के साथ शहर का सर्वेक्षण कर रही है, मार्गों की योजना बना रही है और आधुनिक उपकरणों के साथ स्वच्छता में सुधार के लिए कचरा उत्पादन का आकलन कर रही है।