शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

नव्या आयुक्तांनी विमानात घेतल्या जनतेच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:37 AM

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक मंगळवारी मुंबईहून औरंगाबादला विमानाने आले. विमान प्रवासात त्यांनी सर्व प्रवाशांना स्वत:ची ओळख करून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक मंगळवारी मुंबईहून औरंगाबादला विमानाने आले. विमान प्रवासात त्यांनी सर्व प्रवाशांना स्वत:ची ओळख करून दिली. सर्व प्रवाशांना त्यांनी एक कोरा कागद दिला. या कागदावर शहरात काय हवे, समस्या काय ही लिहून द्यावी, अशी विनंती केली. सर्व प्रवाशांनी आयुक्तांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ३० पेक्षा अधिक नागरिकांनी शहराबद्दल आपले मत व्यक्त केले.तीन महिन्यांनंतर मंगळवारी शहराला नवीन मनपा आयुक्त मिळाले आहेत. डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी मुंबईहून औरंगाबादकडे विमानाने येत असताना भन्नाट शक्कल लढविली. विमान प्रवासात वायफळ गप्पा मारण्यापेक्षा त्यांना एक युक्ती सुचली. एअर हॉस्टेस ज्या पद्धतीने अनाउन्समेंट करतात त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रवाशांना आपली ओळख करून दिली. मी तुमच्या शहराचा नवीन मनपा आयुक्त आहे, आपल्याला देण्यात आलेल्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर मनपाकडून असलेल्या अपेक्षा लिहून द्या. आयुक्तांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रवाशांना सुखद धक्का बसला. प्रवाशांनीही तातडीने आपल्या अपेक्षा लिहून दिल्या. जवळपास तीस जणांनी नव्या आयुक्तांकडे अपेक्षा आणि सूचना लिहून दिल्या. त्यातील काही सूचना खूप आवडल्याचे सायंकाळी पत्रकारांसोबत गप्पा मारताना त्यांनी सांगितले. नागरिकांनी दिलेल्या चिठ्ठ्याही त्यांनी दाखविल्या.नागरिकांच्या अपेक्षा खूप आहेत. एका दिवसात सर्व प्रश्न सोडविणेही अशक्य आहे. हळूहळू प्रत्येक प्रश्नात लक्ष घालून तो सोडवून घेण्यावर अधिक भर राहणार आहे. मनपाची गेलेली पत परत आणण्यासाठी संपूर्ण प्रशासन काम करणार आहे.ट्विटर अकाऊंटनागरिकांसोबत संपर्कात राहण्यासाठी आपण ट्विटरवर नवीन अकाऊंट उघडला आहे.  यावर नागरिकांनी सूचना मांडाव्यात, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcommissionerआयुक्त