शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

‘नेट’ पोहोचले पण एसटी नाही

By admin | Published: October 25, 2014 11:43 PM

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस केवळ चंद्रावरच नव्हे तर आता मंगळावरही जाऊन पोहोचला आहे़ परंतु, हाळी हंडरगुळीपासून जवळच असलेले खरबवाडी हे एक असे गाव आहे,

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळीविज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस केवळ चंद्रावरच नव्हे तर आता मंगळावरही जाऊन पोहोचला आहे़ परंतु, हाळी हंडरगुळीपासून जवळच असलेले खरबवाडी हे एक असे गाव आहे, जिथे अजूनही एसटीचा फेरा झाला नाही़ गावात इंटरनेट जोरात चालते पण एसटीची चाके अजून तरी चालत नाहीत़खरबवाडी हे तसे अहमदपूर तालुक्यातील गाव़ परंतु, बराचसा व्यवहार त्यांचा हाळी-हंडरगुळीशी जोडलेला़ जवळपास तीन-साडेतीनशे उंबऱ्याचं हे गाव़ आठराशेच्या आसपास लोकसंख्या़ पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय या गावात आहे़ स्वतंत्र ग्रामपंचायतही अस्तित्वात आहे़ परंतु, गाव विकासापासून कोसो दूर राहिले आहे़ हाळी-हंडरगुळीपासून या गावाचे अंतर ३ किमी इतके आहे़ त्यामुळे खरबवाडीचा दैनंदिन व्यवहार या गावाशी जोडला गेला आहे़ खरबवाडीच्या नागरिकांना कुठे बाहेरगावी जायचे असल्यास त्यांना एकतर हाळी गाठावी लागते किंवा शेजारील वायगाव पाटी़ ही दोन्ही ठिकाणे ३ ते ४ किमी अंतराची़ या अंतराचा रस्ताही धड नाही़ त्यामुळे नागरिकांची पायपीटही फारशी सोपी नाही़ पावसाळ्यात अगदी जीवावर उदार होऊन गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते़ या समस्येकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे़ गावात एसटी सुरु करावी, यासाठी परिवहन विभागाकडे वेळोवेळी लेखी निवेदने दिली़ रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे चकरा मारल्या़ परंतु, कुठेही दाद मिळत नसल्याचे सरपंच माधव डप्पडवाड यांनी हताशपणे सांगितले़ त्यामुळे खरबवाडीचे भाग्य उजळणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़ बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ ४अठराशेच्या वर लोकसंख्या असलेल्या खरबवाडीला आजतागायत परिहवन विभागाने एसटीची सेवा दिली नाही़ गावात इंटरनेट चांगले चालते़ परंतु, एसटीची चाके चालत नाहीत़ असे असताना दर पाच वर्षातून एकदा मात्र एसटीचे दर्शन ग्रामस्थांना होते़ निवडणूकीच्या वेळी मतदान यंत्र नेण्यासाठी एसटी खरबवाडीचा रस्ता धरते़ त्यानंतर मात्र चुकूनही तिची चाके या गावाकडे वळत नाहीत़