सव्वालाखाचे नेकलेस केले परत
By Admin | Updated: December 27, 2015 00:16 IST2015-12-27T00:09:43+5:302015-12-27T00:16:48+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील एका ११ वर्षीय मुलीने रस्त्यात सापडलेले सव्वालाखाचे नेकलेस मामाच्या मदतीने संबंधित महिलेच्या हवाली करून

सव्वालाखाचे नेकलेस केले परत
वाळूज महानगर : बजाजनगरातील एका ११ वर्षीय मुलीने रस्त्यात सापडलेले सव्वालाखाचे नेकलेस मामाच्या मदतीने संबंधित महिलेच्या हवाली करून समाजात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याची प्रचीती आणून दिली.
अस्मिता संदीप खर्चे असे मुलीचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेलगाव बाजार येथील रहिवासी असलेली अस्मिता बजाजनगरात श्रीकृष्ण भोळे या आपल्या मामाकडे शिक्षणानिमित्त आहे. तनवाणी विद्यालयात सहावीच्या वर्गात ती शिक्षण घेते.
१५ डिसेंबरला सायंकाळी अस्मिता कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना रस्त्यात नेकलेस सापडले. तिने हे नेकलेस श्रीकृष्ण भोळे आणि मीनाक्षी भोळे यांच्याकडे देऊन संबंधित महिलेस परत देण्याची विनवणी केली. त्यानंतर मामा-मामीने बजाजनगरात शोधमोहीम राबविली.