शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दीड कोटीसाठी मित्राच्या मदतीने भाच्याचे अपहरण; मुंबईच्या फौजदारासह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:06 IST

पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

ठळक मुद्देतिघांनी मुलाच्या आजी-आजोबांना केली मारहाण विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. दिड कोटीची खंडणी मागितली

औरंगाबाद: कौटुंबिक वादातून मित्राच्या मदतीने मेहुण्याला बेदम मारहाण करून सहा वर्षीय भाच्याचे दिड कोटी रुपयांसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी विद्यानगर येथे घडली. याप्रकरणी वकिल पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्यांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

फौजदार अमोल चव्हाण(नेमणूक चेम्बुर ठाणे, मुंबई), मुलाचा मामा कृष्णा बापुराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील अ‍ॅड.श्रीकांत तात्यासाहेब वीर (वय ४०)यांचे त्यांची पत्नी अ‍ॅड. सोनाली यांच्यासोबत पटत नाही. यामुळे वर्षभरापासून वीर पती-पत्नी विभक्त राहते. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) असे अपत्ये आहे.आर्या आईसोबत मुंबईत तर रमन हा वडिलासोबत औरंगाबादेत राहतो. त्यांच्यात मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने अ‍ॅड. श्रीकांत वीर यांनी रमन यास १८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या केसची तारीख २९ जून रोजी ठेवली आहे. १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अ‍ॅड. श्रीकांत हे त्याच्या विद्यानगर येथील घरी असताना  फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर, शांभवी मालवणकरसह  सात जण काठ्या आणि चाकू घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी रमनला बळजबरीने त्यांच्या घरातून हिसकावून नेले. 

दिड कोटीची खंडणी मागितलीरमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर परिवाराकडे दिड कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुलगा हवा असेल तर दिड कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा मुलाचा जीव कसा घ्यायाचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,अशी धमकीच आरोपींनी दिल्याचे वीर यांनी तक्रारीत नमूद केले. 

वीर यांच्या वृद्ध आई-वडिलांना केली मारहाणयावेळी श्रीकांत आणि त्यांच्या वृद्ध आर्ई-वडिलांनी  आरोपींना अडविण्याचा आणि रमनला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तेथे दहशत निर्माण करीत त्यांना बेदम मारहाण केली. यामुळे कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. ही घटना समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फौजदार चव्हाण, मालवणकर आणि श्यामभवीला पकडले. दरम्यान याप्रकरणी श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण करणे, खंडणी मागणे, दंगा करणे, मारहाण करणे,आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहे.

 

टॅग्स :KidnappingअपहरणAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक