लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:00 PM2018-05-05T16:00:17+5:302018-05-05T16:02:51+5:30

खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळवण्याचा विक्रम केला आहे.

Neha from Loha topped in the 'MPSC' exams | लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर

लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर

googlenewsNext

औरंगाबाद : मेहनत, जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील नेहा नरेंद्र पवार हिला आला आहे. खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये टॉपर येण्याचा विक्रम केला आहे.

एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातुन अधिकारी होण्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये राहून खाजगी शिकवणी लावतात. मात्र प्रत्येक वर्षी तुटपुंज्या जागा निघाल्यामुळे अनेकांना मेहनत करूनही संधी मिळत नाही. यात आपला नंबर लागलाच पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नाची परकाष्टा करतो. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रहिवाशी असलेल्या नेहा नरेंद्र पवार या विद्यार्थिनींने एमपीएससीच्या एकच नव्हे तर दोन परीक्षेत यश मिळविले.

विक्रिकर निरिक्षक या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. एमपीएससीतर्फे घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी पदासाठीच्या परीक्षेचा निकाल २१ एप्रिल रोजी लागला. यात सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत पहिल्या आणि विक्रिकर निरिक्षकमध्ये दुसऱ्या प्रयत्नात महिला खुल्या गटात तिसरा आणि पहिला क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान नेहाने पटकावला. या दुहेरी यशामुळे नांदेड जिल्ह्यात नेहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळवता आले असल्याचे नेहाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कौटुंबिक पार्श्वभूमी बेताचीच
नांदेड जिल्ह्यातील लोह्याची रहिवाशी असलेल्या नेहाच्या वडिलांचे १८ वर्षांपुर्वीच निधन झालेले आहे. यानंतर आईनेच दोन्ही मुलींचा सांभाळ करत शिक्षण दिले. नेहाची मोठी बहिण नयना हिने एमपीएससीची तयारी करत विक्रिकर निरिक्षक परीक्षेत यश मिळवले. नेहानेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील नामांकित खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अधिकारी होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देत नांदेड येथे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 

राज्यसेवा परीक्षेत यश मिळवायचे आहे 
कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावताही  ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत यश मिळवले. मात्र यावरच समाधान न मानता राज्यसेवा परीक्षेत यश मिळवायचे आहे. उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. 
- नेह पवार

Web Title: Neha from Loha topped in the 'MPSC' exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.