शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 4:50 PM

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध आरोपांची चौकशी एस. एफ. पाटील समितीने केली

ठळक मुद्देउच्चशिक्षण विभाग म्हणतो राज्यपालांकडे पाठविलाराज्यपाल कार्यालय सांगते मिळालाच नाही

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या एस. एफ. पाटील समितीच्या अहवालावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मराठवाडा विकास कृती समिती आणि मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे मागील महिनाभरापासून औरंगाबाद आणि मुंबईत बेमुदत उपोषण सुरू आहे. 

मराठवाडा विकास कृती समितीचे मागील ३० दिवसांपासून विभागीय आयुक्तालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांना उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपोषण मागे घेण्यास सांगितले. कुलगुरूंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शासनाकडे अहवाल सादर केला. हा चौकशी अहवाल शासनाने पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठविल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे उपोषणकर्ते डॉ.दिगंबर गंगावणे यांनी सांगितले. डॉ.खरात आणि राहुल वडमारे यांच्यात झालेला संवादच ‘लोकमत’ला मिळाला आहे. उपोषणकर्त्यांनी उच्चशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार डॉ. खरात यांनी उपोषणकर्त्याशी संवाद साधला. शासनाने चौकशी अहवाल राज्यपालांकडे दिला आहे. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. त्यामुळे आपण उपोषण थांबवावे, असेही डॉ. खरात यांनी स्पष्ट केले. राज्यपालांना कोणीही सांगू शकत नाही. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हेसुद्धा या विषयात काहीही करू शकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.  

याच वेळी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे चौकशी अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते यांनी राज्यपाल कार्यालयातील अव्वर सचिव प्रताप लुबाळ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शासनाकडून कुलगुरूंच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगून, अहवाल प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. त्यानंतर मराठवाडा कृती समितीच्या सदस्यांनी मंत्रालयात डॉ. सिद्धार्थ खरात यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यपालांकडे अहवाल पाठविला असल्याचे सांगितले. यावरून कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचे नवनाथ देवकते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डॉ. खरात यांच्या भेटीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उच्चशिक्षण सचिव सौरभ विजय यांची भेट घेऊन हा टोलवाटोलवीचा प्रकार त्यांना सांगितला असल्याचे स्पष्ट केले.

सेवानिवृत्तीचे लाभ थांबविले?कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे विद्यापीठातून ३ जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे वय ६२ वर्षांहून अधिक असल्यामुळे त्यांना पुन्हा पुणे विद्यापीठात रुजू होता येणार नाही. कुलगुरू या पदावरूनच ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने विभागीय उच्चशिक्षण विभागाकडून माहिती मागविली होती. त्यांना सहसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगुरूंच्या  विरोधातील चौकशी संदर्भातील कोणतीही सूचना राज्यपाल कार्यालयांकडून प्राप्त झालेली नाही. शासन निर्णयाद्वारे कुलगुरूं ची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यपालांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादfundsनिधीEducation Sectorशिक्षण क्षेत्र