शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार

By विकास राऊत | Updated: October 3, 2023 19:10 IST

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मतदार सर्वेक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या मुख्याध्यापकांना आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न देणाऱ्या सहशिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्व मतदारसंघ सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार पल्लवी लिगदे यांनी सिटी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस गणेशोत्सवानिमित्त व्यस्त होते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक, कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय काम सांभाळून उर्वरित वेळेत घरोघरी जाऊन ज्या मतदारांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांची भेट घेणे. तसेच मयत, स्थलांतरित, नवमतदार यांची माहिती भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु काही शाळा व इतर कार्यालयांनी वारंवार नोटिसा देऊन देखील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही, अशा शिक्षक व मुख्याध्यापकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, असे लिगदे यांनी सांगितले.

या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार: मुख्याध्यापक मिसाळ, देशमुख, सहशिक्षक श्वेता साबळे, एस. ए. शेख, एस. डी. जाधव, शमीम बेगम, आनंद सातदिवे, स्वामी जाधव, विजय आगाव, के. डी. बावस्कर, कैलास टेकाळे यांना दिलेले सर्वेक्षणाचे काम अपूर्ण राहिले आहे. हे कर्मचारी गारखेडा, मिसारवाडी, नारेगावमधील विविध शाळांतील आहेत. कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक विभागाला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना नोटिसा बजावल्या. हे कर्मचारी निवडणूक कामकाजास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून एफआयआर देण्यात यावा, असे तहसीलदार लिगदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी अजून काही कार्यवाही केलेली नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTahasildarतहसीलदारElectionनिवडणूकTeacherशिक्षक