शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

निवडणूक कामात हलगर्जीपणा, सिल्लोड तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:00 IST

मंडळ अधिकारी कचरू दादाराव तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सिल्लोड (औरंगाबाद) : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कामात सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांने हेतूपुरस्कर टाळाटाळ, हलगर्जीपणा केला. यामुळे कृषी अधिकाऱ्याच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आज दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. न्यानेश्वर बरदे असे अधिकाऱ्याचे नाव आहे. 

मंडळ अधिकारी कचरू दादाराव तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी बरदे याने निवडणुकीसारख्या अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय कामात हेतूपुरस्कर टाळाटाळ केली. यावरून त्याच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार संबंधिताने संवैधानिक जवाबदारी पार पाडण्यात कुचराई केली आहे. तसेच जिल्हा अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम १३४,१६७,लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १८८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब झिंझुरडे करत आहे.

निवडणूक कामात माझी नेमणूक करण्यात आली होती. मात्र नेमणूक रद्द करावी, अशी विनंती सिल्लोड तहसीलदारांकडे केली होती. ती त्यांनी मान्य ही केली होती. तरी माझ्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला याची कल्पना नाही.- न्यानेश्वर बरदे तालुका कृषी अधिकारी सिल्लोड.

नेमणूक रद्द करण्यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी कोणतेही पत्र दिले नव्हते. निवडणुकीत त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.- विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद