फोटो मिक्सिंग करून बदनामीची धमकी
By Admin | Updated: January 13, 2017 00:32 IST2017-01-13T00:28:52+5:302017-01-13T00:32:29+5:30
बीड : फोटो काढण्यासाठी दुकानात गेलेल्या विवाहित महिलेच्या फोटोसोबत स्वत:चे फोटो जोडून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या छायाचित्रकाराला पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले.

फोटो मिक्सिंग करून बदनामीची धमकी
बीड : फोटो काढण्यासाठी दुकानात गेलेल्या विवाहित महिलेच्या फोटोसोबत स्वत:चे फोटो जोडून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या छायाचित्रकाराला पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. ही घटना साक्षाळपिंप्री येथे घडली.
सचिन बापूराव काशिद (रा. साक्षाळपिंप्री) असे त्या छायाचित्रकाराचे नाव आहे. वर्षभरापूर्वी गावातील एक विवाहित तरुणी त्याच्या दुकानात फोटो काढण्यासाठी गेली होती. सचिनने तरुणीच्या खांद्यावर हात ठेवल्याचा स्वत:चा फोटो जोडला. त्यानंतर तिच्या मोबाईलवर संपर्क साधून अनैतिक संबंधाची मागणी केली. गुजरात येथे माझ्यासोबत चल, अन्यथा तुला बदनाम करतो, अशी धमकी दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून सचिन काशिदसह भगवान हौसाराव काशिद, श्रीराम ऊर्फ पप्पू बंडू काशिद यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. (प्रतिनिधी)