शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"पक्षातील 'त्या' नेत्यांचे भाजपकडून राजकीय एन्काऊंटर"; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 14:56 IST

"मधल्या काळात ज्यांना संधी मिळाल्या, त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम चांगले."

औरंगाबाद: शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)  सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कौतुकही केले. भाजपसारख शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही. शिवसेनेच्या सभांना गर्दी आपोआप होत असते, अशी टीका गोऱ्हे यांनी यावेळी केली.

'नामकरणाचा प्रस्ताव नाही तर...'औरंगाबादमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी नामांतराचा विषय काढल्याची टीका भाजपकडून होत आहे. त्यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आला नसल्याचे भाजप नेते म्हणत आहेत. नामकरणाचा प्रस्ताव आला नाही तर तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांकडून प्रस्ताव पाठवावा, त्यांनी केंद्रामध्ये बैठक घ्यावी, त्यांनी त्याचे श्रेय घ्यावे', असे त्या म्हणाल्या.

'भाजपकडून राजकीय एन्काउंटर'त्या पुढे म्हणाल्या की, 'देवेंद्र फडणवीस मी परत यायला तयार आहेत, पण तसे होणार नाही. भाजपचा जो नेता म्हणतो मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्याचा राजकीय एन्काउंटर करण्याची भाजपची निती आहे. आम्हाला माणसं जमविण्यासाठी नववारी नेसुन इव्हेंट करावे लागत नाही,' अशी टीका त्यांनी केली. तसेच, 'शिवसेनेचे आमदार अभेद्य राहतील अशी अपेक्षा, निवडणूकांमध्ये आम्हाला यश मिळेल,' असा विश्वासही राज्यसभा निवडणुकांबाबत बोलून दाखवला.

पंकजा मुंडेचे कौतुकयावेळी गोऱ्हे यांनी राज्यसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांवर भाष्य केले. 'राज्यसभानंतर विधानपरिषद गणित कसं जमवायचे यासाठी आम्ही सक्षम आहोत. गोपीनाथ मुंडेंचा वारसा असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदसाठी शुभेच्छा आहेत. मधल्या काळात ज्या लोकांना भाजपने विधान परिषदेवर घेतले, त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम नक्कीच चांगले आहे, त्यांना संधी मिळायलाच हवी,' असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेAurangabadऔरंगाबादPankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना