अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:57+5:302021-07-09T04:05:57+5:30

औरंगाबाद : उच्च शिक्षणात अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात आयोजित वेबिनारमध्ये अनेक मान्यवरांची केले. ५ ...

The need to increase the quality of teaching | अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याची गरज

अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याची गरज

औरंगाबाद : उच्च शिक्षणात अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात आयोजित वेबिनारमध्ये अनेक मान्यवरांची केले.

५ जुलै रोजी आयोजित ‘फॉस्टररिंग टीेचिंग लर्निंग प्रॅक्टिसेस फॉर क्वालिटी इनहॅन्समेन्ट इन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन’ या विषयावर चार सत्रांत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. रणजिंतसिंह निंबाळकर, हैदराबाद विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. बी. राजशेखर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. उल्हास उढाण, डॉ. एस. शंकर, प्रा. कल्पना चव्हाण, मुंबईतील सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी आदी सहभागी झाले होते.

या वेबिनारमध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि अध्ययन व अध्यापनामध्ये होत असलेले बदल तसेच मूल्यांकनाच्यादृष्टीने ते वृद्धिंगत करण्याची गरज, परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत रोजगाराभिमुखता निर्माण करण्यासाठी आपला अभ्यासक्रम कमी पडत आहे. त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेबिनारमध्ये १४ राज्यांतील तसेच विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक सहभागी झाले होते.

वेबिनारचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र सातपुते यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक महाविद्यालयातील आयक्युएसीचे समन्वयक डॉ. युगंधरा टोपरे यांनी केले. उद्‌घाटनाचे सूत्रसंचालन डॉ. तलत खान यांनी केले.

Web Title: The need to increase the quality of teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.