परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण होणे काळाची गरज
By Admin | Updated: September 24, 2014 01:05 IST2014-09-24T00:48:44+5:302014-09-24T01:05:35+5:30
औरंगाबाद : आजच्या काळात परराष्ट्र धोरण हा विषय पूर्वीच्या तुलनेत अतिशय संवेदनशील आहे.

परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण होणे काळाची गरज
औरंगाबाद : आजच्या काळात परराष्ट्र धोरण हा विषय पूर्वीच्या तुलनेत अतिशय संवेदनशील आहे. व्यक्ती आणि राष्ट्राच्या हितसंबंधांशी तो जोडलेला असून, परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण होणे आवश्यक
आहे.
देशात परराष्ट्र धोरण हा विषय सामान्य जनताच नव्हे, तर केंद्र सरकारकडूनही दुर्लक्षित केला गेलेला विषय आहे; परंतु अलीकडे प्रसारमाध्यमांमुळे या विषयाचे महत्त्व आणि आवश्यकता सर्वांना पटत आहे, असे प्रतिपादन जागतिक राजकारणाचे अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
देवगिरी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. उद््घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी म.शि.प्र. मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. मोहनराव सावंत
होते.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, परराष्ट्र धोरण हा विषय अतिशय महत्त्वाचा असून सामाजिकशास्त्राप्रमाणेच इतर शास्त्रांच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करावा. प्राचार्य डॉ. माणिकराव जाधव यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. सिंधुदुर्ग येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश पातरफोड यांनी विचार मांडले.
जानेवारी २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३२ वे अधिवेशन बांधा कॉलेज (ता. सावंतवाडी) येथे होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अशोक नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.