बौद्धिक सुपिकतेसाठी धम्म परिषदांची आवश्यकता
By Admin | Updated: January 15, 2017 23:27 IST2017-01-15T23:25:04+5:302017-01-15T23:27:32+5:30
लोहारा : रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बौद्धिक सुपिकतेसाठी धम्म परिषदांची आवश्यकता
लोहारा : पडीक जमीन सुपीक करण्यासाठी जशी मशागतीची गरज असते तशीच बौद्धिक सुपिकता येण्यासाठी धम्म परिषदांची नितांत आवश्यकता आहे. गावा-गावात बुद्धविहार स्थापन करून श्रामणेर शिबीर, धम्म जागृती होणे गरजेचे असून, यासाठी स्वत:तील दोष नष्ट करून सत्य अनुभवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भन्ते उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी केले़
शहरातील लोहारा हायस्कूल प्रांगणात रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्खु नागसेन महाथेरो (सोलापूर), नागसेन बोधी ( उदगीर), आर्या धम्मचारीणी, सुमेध नागसेन आदी उपस्थित होते. भन्ते उपगुप्त महाथेरो म्हणाले की, द्वेश, मोह, राग, भय, लोभ हे आश्रव नाहिसे करून माणूस बनण्याचा प्रयत्न तथागत बुद्धांनी केला. सत्य जाणा, प्रेमाने वागा, द्वेष करू नका, कोणाच्या ही भूलथापाना भुलू नका, असेही ते म्हणाले़
यावेळी प्रा. राहूल कदम यांचा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, दत्ता गायकवाड, अभियंता डी. एन. सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. सुधाकर गायकवाड, विष्णू वाघमारे, जयश्रीताई कांबळे, जीवन गायकवाड, गजेंद्र डावरे, दिगंबर कांबळे, अरविंद गायकवाड, प्रविण कांबळे, जयश्री मस्के, स्वप्निल सुर्यवंशी, राम कांबळे, दिलीप मसुरे, ऋषीकेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले़ नितीन वाघमारे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. दरम्यान, शहरातून सकाळी भव्य धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीत बौध्द उपासक, उपासिका सहभागी झाल्या होत्या़