‘एक मूल, एक झाड’ संकल्पना हवी

By Admin | Updated: December 20, 2015 00:08 IST2015-12-19T23:55:03+5:302015-12-20T00:08:33+5:30

औरंगाबाद : पहिलीत प्रवेश देताना मुलाकडून एक झाड लावून घेण्याबरोबरच त्याचे संवर्धन करावे. आपल्याबरोबरच वाढत जाणारे हे झाड मुलाला कायम आनंद देत राहील.

Need 'Concept of One Child, One Tree' | ‘एक मूल, एक झाड’ संकल्पना हवी

‘एक मूल, एक झाड’ संकल्पना हवी

औरंगाबाद : पहिलीत प्रवेश देताना मुलाकडून एक झाड लावून घेण्याबरोबरच त्याचे संवर्धन करावे. आपल्याबरोबरच वाढत जाणारे हे झाड मुलाला कायम आनंद देत राहील. ‘एक मूल, एक झाड’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास एक दिवस पृथ्वी हिरवीगार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ‘फॉरेस्ट मॅन आॅफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री जादव पायेंग मुलाई यांनी शनिवारी (दि.१८) येथे केले.
‘एमजीएम’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मिलिंद भागवत यांनी जादव पायेंग तसेच त्यांच्या कार्याला पहिल्यांदा प्रकाशझोतात आणणारे पत्रकार जितू कलिता यांची प्रकट मुलाखत घेतली. ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
१,२०० एकरावर फुलविले जंगल
आसाममधील जोऱ्हाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे हे जादव पायेंग यांची कर्मभूमी. ओसाड, रेताड बेटावर गेल्या ३५ वर्षांपासून झाडे लावण्याचा जादव यांचा दिनक्रम पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतरही सुरू आहे. ‘पहाटे साडेतीन वाजता माझा दिवस सुरू होतो. विविध झाडांची रोपे, बियाणे यांनी भरलेली पिशवी सायकलला अडकून मी निघतो. पाच कि. मी. पर्यंतचा प्रवास करून ब्रह्मपुत्रा नदी गाठतो. त्यानंतर सायकल व पिशवी छोट्या होडीत ठेवून पुढील प्रवास सुरू होतो. नदीच्या पोटातून सुमारे सहा कि. मी. गेल्यानंतर होडी थांबते. पुन्हा सायकल यात्रा सुरू होते. पाच कि. मी. अंतर चालल्यानंतर एकेकाळचे ओसाड बेट लागते. याठिकाणी आता १,२०० एकर जमिनीवर जंगल फुलविले आहे. हत्ती, वाघ, हरिण, साप अशा जनावरांचे ते आश्रयस्थान बनले आहे. गाय, म्हैस व वराह पालनातून मिळणाऱ्या पैशात माझा उदरनिर्वाह चालतो. विशेष म्हणजे पद्मश्रीसह विविध पुरस्कारांच्या रुपाने

Web Title: Need 'Concept of One Child, One Tree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.