समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:47+5:302021-07-14T04:06:47+5:30
कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार ...

समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज
कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार आहे. येणारा काळ हा खडतर आहे. आपल्याला समाजाचे प्रश्न आरक्षण, नॉन-क्रिमीलियर, तांडा-वस्ती योजना, वसंतराव नाईक मंडळाला निधी ह्या सर्व प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी केले. त्यांनी रविवारी तालुक्याचा दौरा करुन समाजबांधवांशी संवाद साधला.
संजय राठोड यांच्या आशीर्वाद यात्रा दौऱ्याची जैतखेडा येथून सुरुवात झाली. पारंपरिक बंजारा वेशभूषा करुन व लेंगीनृत्य करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोहर्डा, कन्नड येथे राठोड यांनी भेट देऊन चैतन्य धाम, तेलवाडी येथे दर्शन घेतले. आंबा, वडनेर, सीतनाईक तांडा, मुंदवाडी, जामडी घाट, पुरणवाडी, रामपूरवाडी व उंबरखेड येथे भेट देऊन त्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.