संविधानविषयक सर्वसामान्यांमध्ये जागृतीची गरज
By Admin | Updated: April 20, 2015 00:30 IST2015-04-20T00:12:08+5:302015-04-20T00:30:20+5:30
जालना : सर्वसामान्यांना न्याय, समता, अधिकार मिळावेत, हाच संविधानाचा उद्देश होता, असे सांगून अॅड. महेंद्र जाधव व प्रा. दिगंबर कांबळे (हैद्राबाद) यांनी

संविधानविषयक सर्वसामान्यांमध्ये जागृतीची गरज
जालना : सर्वसामान्यांना न्याय, समता, अधिकार मिळावेत, हाच संविधानाचा उद्देश होता, असे सांगून अॅड. महेंद्र जाधव व प्रा. दिगंबर कांबळे (हैद्राबाद) यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वसामान्यांपर्यंत संविधानविषयक जनजागृती व्हावी, असे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जिल्हा वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. जाधव, प्रा. कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता डॉ. रेणुका भावसार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सय्यद तारीक, जिल्हा सरकारी वकील अॅड. मुकुंद कोल्हे, अॅड. महेश धन्नावत, अॅड. अरविंद मुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्थप्राप्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीला अधिक महत्व दिले. शेतीचे राष्ट्रीयकरण व्हावे, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला. राष्ट्रीयकरणामुळे देशावर नियंत्रण राहील.
शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होईल, असे डॉ. आंबेडकर यांनी पटवून दिले होते. डॉ. आंबेडकर यांनी सर्वात जास्त लिखाण अर्थशास्त्रावर केले. ते महान अर्थतज्ज्ञ होते, असेही उभयंतांनी आपल्या व्याख्यानाद्वारे सांगितले.
यावेळी अॅड. बी.एम. साळवे, अॅड. बी.एम. ससाने, अॅड. झेड. बी. मिसाळ, अॅड. मनोरमा तिडके, अॅड. कल्पना त्रिभुवन, अॅड. गोविंद रत्नपारखी, अॅड. भगवान गिराम, अॅड. माणिकराव बनसोडे, अॅड. राजेंद्र साळवे, सुभाष देवीदान, अॅड. रेखा कांबळे, रेखा जाधव, अॅड. महेंद्र साळवे, अॅड. गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)