शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

कचरा निर्मूलनात नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक; औरंगाबाद खंडपीठाचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:41 IST

नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनीच करायला हवे.’ असे मत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी व्यक्त केले. 

औरंगाबाद : ‘शहरातील कचरा निर्मूलनाची जबाबदारी एकट्या महापालिकेची नसून, नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनीच करायला हवे.’ असे मत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी कचऱ्यासंदर्भातील याचिकांच्या सुनावणीत गुरुवारी (दि.२७) व्यक्त केले. 

कचरा वर्गीकरणाबाबत महापालिकेने प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे, यासाठी सेलिब्रिटीजची मदत घ्यावी, पथनाट्याचाही उपयोग करता येऊ शकेल. खंडपीठ वकील संघानेही यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया या संदर्भात महापालिकेने ज्या यंत्रणा उभारल्या आहेत, त्याच्या कामाची पाहणी, मजुरांची संख्या, होत असलेले काम आदींसंदर्भात सध्या देखरेख ठेवणाऱ्या समितीमध्ये याचिकाकर्त्याचाही समावेश करावा. १९ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण झाल्याशिवाय शासनाने दिलेल्या ९२ कोटी रुपयांचा वापर करता येणार नाही, असा शासन निर्णय असताना त्या निधीचाही वापर होतो आहे. तो थांबवावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती खंडपीठाने अमान्य केली.

पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी आणि चिकलठाणा येथे वर्गीकरण न करताच महापालिका कचरा टाकत असल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या याचिका तसेच मूळ अवमान याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. कचऱ्याचे वर्गीकरण न करताच तो टाकला जात असल्याच्या आक्षेपांवर खंडपीठाने निर्देश दिले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन समितीचे प्रमुख यांच्या समितीमध्ये याचिकाकर्त्यांचा समावेश करावा आणि त्यांनी कचरा प्रक्रिया केंद्राच्या पाहणीवेळी या सदस्यांना बरोबर न्यावे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. वाघ, मूळ याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, तर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. उत्तम बोंदर यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ