राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे ‘व्हीप’
By Admin | Updated: March 14, 2017 23:43 IST2017-03-14T23:41:35+5:302017-03-14T23:43:51+5:30
बीड : राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारच्या तारखेत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना काढलेल्या व्हीपमध्ये संदीप क्षीरसागर यांना मतदानाच्या निर्णयाचे अधिकार दिल्याचे कळविले होते.

राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे ‘व्हीप’
बीड : राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारच्या तारखेत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना काढलेल्या व्हीपमध्ये संदीप क्षीरसागर यांना मतदानाच्या निर्णयाचे अधिकार दिल्याचे कळविले होते. तत्पूर्वी १२ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बजावलेल्या व्हीपद्वारे शिवसंग्राम- शिवसेनेच्या तालुका विकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. हे दोन्ही व्हीप सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राकाँच्या दोन्ही सदस्यांनी अखेर जिल्हाध्यक्षांचा व्हीप प्रमाण मानून तालुका विकास आघाडीलाच सहकार्य केले. त्यामुळे सेना- शिवसंग्राम सत्तेपर्यंत पोहोचू शकले. सभेपूर्वी शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी शिवसंग्राम, सेना, भाजप व राष्ट्रवादीचे ९ सदस्य एकवटले होते. तेथे चारही पक्षांच्या नेत्यात गुफ्तगू झाले. भगवे झेंडे फडकावत, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा झाला. (प्रतिनिधी)