शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

औरंगाबाद महापालिकेत महाविकास आघाडीला राष्ट्रवादीचे इच्छुक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 19:28 IST

महाविकास आघाडी केल्यास बंडखोरी होईल, असे मत एका इच्छुकाने व्यक्त केले.

ठळक मुद्दे सुप्रिया सुळे यांनी जाणून घेतली मने 

औरंगाबाद : महाविकास आघाडी करून मनपा निवडणूक लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उत्सुक असल्याचे आज येथे स्पष्ट झाले. रात्री ९.१५ वा. राष्ट्रवादी भवनात आल्याबरोबर कसलीही औपचारिकता न पाळता राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी सूत्रे हातात घेऊन ‘महाविकास आघाडी व्हावी असे किती जणांना वाटते’ असा थेट प्रश्न खचाखच भरलेल्या सभागृहासमोर टाकला आणि जवळपास साऱ्याच जणांनी  हात वर केले. फक्त तीन- चार जणांनीच काय ते हात वर केले नाहीत. महाविकास आघाडी केल्यास बंडखोरी होईल, असे मत एका इच्छुकाने व्यक्त केले.

रात्र होत होती म्हणून सुप्रिया सुळे यांनी आधी महिलांमधील इच्छुकांशी संवाद साधला. काही जणींनी आपले म्हणणेही मांडले. महिला उमेदवारांसाठी मी आवर्जून सभा घेईन, असे आश्वासन टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी दिले.यावेळी विद्यापीठाच्या मुला-मुलींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलेले होते. त्यांचे निवेदन घेतल्यानंतर त्या मुला- मुलींनाही त्यांनी जायला सांगितले. 

पुरुष इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच सुप्रिया सुळे या अल्पोपाहार करू लागल्या. डाएट कंट्रोलचा एक भाग म्हणून कमी व वेळेवर खाण्यावर ताई भर देतात, असे सांगण्यात आले.‘माझ्याजवळ आज भरपूर वेळ आहे असे सांगत सुळे यांनी कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी कैलास पाटील, विजय साळवे, कदीर मौलाना, कमाल फारुकी, रंगनाथ काळे, छाया जंगले, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अचानक घेतली बैठकदोन दिवसांच्या दौऱ्यात सुळे यांचा औरंगाबादेत फक्त मुक्काम सोडता दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता; परंतु अचानक राष्टÑवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या संवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. कमी वेळ असतानाही कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी भवनात गर्दी केली होती. कन्नडहून येईपर्यंत कार्यकर्ते थांबले होते. हारतुऱ्यांची कोणतीही औपचारिकता यावेळी पाळली गेली नाही. ती पाळू नका असे स्वत: सुप्रिया सुळे यांनी सांगून ठेवलेले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे