राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पोस्टाने पाठविल्या गोवऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:02 IST2021-09-05T04:02:12+5:302021-09-05T04:02:12+5:30

औरंगाबाद : गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून केंद्र सरकारकडे ...

NCP women sent postmen to protest against gas price hike | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पोस्टाने पाठविल्या गोवऱ्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पोस्टाने पाठविल्या गोवऱ्या

औरंगाबाद : गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून केंद्र सरकारकडे पोस्टाने गोवऱ्या पाठवण्यात आल्या. त्याचप्रमाणे सरकारविरोधात व भाववाढीच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील व शहराध्यक्षा मेहराज पटेल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रीय सचिव वीणा खरे, गझल जमादार, वैशाली पाटील, सलमा बेगम, विद्या मोरे, शकिला खान, मंजूषा पवार, शमा बाजी, वैशाली चौधरी, स्मिता तुपे, अनिसा खान, सुरेखा जगताप, उमा नेवल, कल्पना कोहळे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी गॅस सिलिंडर दरवाढ कमी झालीच पाहिजे, होत कशी नाही, झालीच पाहिजे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी परिसर दणाणून सोडला.

Web Title: NCP women sent postmen to protest against gas price hike