शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 11:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरू केली होती.

औरंगाबाद -  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरू केली होती. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात आली.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हल्लाबोल यात्रेचा शनिवारी ( 3 फेब्रुवारी) समारोप होणार आहे. यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. अखेर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री उशीरा पोलिसांकडून परवानगी देण्यात आली. 

दरम्यान, पवारांच्या सभेला परवानगी मिळत नसल्यानं संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियोजित ठिकाणी पवार यांची सभा होणारच, असे ठणकावून सांगितले होते. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात काढण्यात आली. तुळजापूर येथून सुरू झालेली ही यात्रा आठही जिल्ह्यांत गेली. या यात्रेचा समारोप येथे होत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या जाहीरसभेला सुरुवात होईल. दरम्यान, शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख दिग्गजांची हजेरी असणार आहे. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते हेदेखील सभेला उपस्थित असणार आहेत.

याआधी १६ ते २४ जानेवारी दरम्यान मराठावाड्यातील आठही जिल्ह्यात घेतलेल्या सभांना जनतेचा अभूतपुर्व असा पाठिंबा मिळाला होता. हल्लाबोल मोर्चा व सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवार पासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तयारीचा आढावा घेतला. सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चा व सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे सरकारविरोधातला हा निर्णायक लढा असल्याचा विश्वास मराठवाड्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार