नायब तहसीलदार काळे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:59 IST2017-07-21T00:57:42+5:302017-07-21T00:59:46+5:30
बीड : कंत्राटदाराकडून लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकलेले माधव काळे याला महसूल सेवेतून निलंबित करण्यात आले

नायब तहसीलदार काळे निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कंत्राटदाराकडून लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकलेले माधव काळे याला महसूल सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काढले असून, ते बुधवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले.
डाटा एंट्रीचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती एक लाख रुपयांत बिल अदा करण्याचे ठरले. १७ जून रोजी लाच स्वीकारताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. दरम्यान, काळे यांच्या सोबत लाच स्वीकारणारा अभिजित दहिवाळ या अव्वल कारकुनाचेही निलंबन अटळ आहे. त्याला निलंबित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.